आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2 जून 2000 ची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आपला 11 वर्षीय मुलगा दीपेश व 7 वर्षीय मुलगी शुभदा यांच्यासोबत साताऱ्याला गेले होते. बोटिंग करताना अपघात झाला आणि शिंदेंची दोन्ही मुले त्यांच्या डोळ्यापुढे बुडाले. त्यावेळी शिंदे यांचा तिसरा मुलगा श्रीकांत केवळ 14 वर्षांचा होता.
एका मुलाखतीत या दुर्दैवी घटनेची आठवण काढत शिंदे म्हणाले होते, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णतः उद्ध्वस्त झालो होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला होता. राजकारणही.'
या घटनेला 22 वर्षे झालीत. आता एकनाथ शिंदेंनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या सिंहासनाला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊया राजकारण सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिंदेंची उंची शिवसेनेत एवढी कशी वाढली? त्यांना पक्षाचे जवळपास दोन तृतीयांश आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यश कसे आले?
शिंदेंच्या राजकीय गुरुशी बाळासाहेबही घाबरत होते
शिंदेंचा जन्म 8 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील डोंगराळ जावळी तालुक्याचे आहेत. पण, त्यांची कर्मभूमी ठाणे राहिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी ऑटो ड्रायव्हर म्हणून काम केले. शिवसेनेचे ताकदवान नेते आनंद दिघे यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. प्रथम शिवसेना शाखा प्रमुख व नंतर ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून ते निवडून आले. पण, मुलगा व मुलीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिघेंनीच त्यांना परत आणले.
आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर शिंदेंकडे राजकीय वारसा
26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अपघात नव्हे तर घात असल्याचे आजही लोक मानतात. त्यांच्या जिवन प्रवासावर नुकताच धर्मवीर नामक एक मराठी चित्रपट आला आहे. दिघे धर्मवीर नावानेही सुप्रसिद्ध होते.
दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेला ठाणे जिल्ह्यावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी एक नवा चेहरा हवा होता. ठाणे हा महाराष्ट्रातील एक मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणे ठाकरे कुटुंबाला परवडणारे नव्हते. शिंदे व दिघे हे पूर्वीपासूनच एकमेकांच्या सानिध्यात असल्याने साहजिकच त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आला. शिंदेंनीही हा वारसा समर्थपणे पेलून जिल्ह्यात शिवसेनेचा डेरेदार वटवृक्ष उभा केला.
सलग चौथ्यांदा विधानसभेवर पोहोचले
शिंदेही आपल्या गुरूंसारखेच लोकनायक म्हणून ओळखले जातात. 2004 मध्ये ते प्रथम आमदार झाले. त्यानंतर त्यांनी केव्हाच मागे वळून पाहिले नाही. पाहता - पाहता त्यांनी ठाण्यात आपले वर्चस्व स्थापन केले. ते तेथील राजकारणाचे केंद्र बनले. 2009, 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. 2014 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही बनले.
मंत्रीपदावर असताना शिंदेंकडे नेहमीच महत्वाचे विभाग राहिले. 2014 मध्ये फडणवीस सरकारकडे त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी मंत्रालय होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी आली. महाराष्ट्रात सामान्यतः मुख्यमंत्री हे मंत्रालय आपल्याकडे ठेवतात.
शिंदेंच्या बंडखोरीमागे फडणवीसांचा हात
आपले वर्चस्व वाढवण्यासाठी शिंदेंनी आपल्या मुलालाही मैदानात उतरवले. व्यवसायाने डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदार संघातून बाहेर आहेत. काहीजण शिंदेंच्या बंडखोरीमागे श्रीकांत यांचाच हात असल्याचाही दावा केला जात आहे.
श्रीकांत यांच्या मते, भाजपसोबत त्यांचे राजकीय भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. भाजपनेही विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिदेंना नेहमीच आतून बळ दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी करण्यासाठी शिंदे हीच मजबूत साखळी असल्याचे फडणवीसांना ठाऊक होते.
भाजपने अनेकवेळा शिंदेंना सरकारमध्ये साइडलाइन केले जात असल्याचा दावा केला. भाजपनेच शिंदेंना त्यांचे आता सेनेत पूर्वीसारखे महत्व राहिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. जेव्हा शिंदे ठाकरेंवर नाराज असल्याचे व ते केव्हाही सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ठाकरेंनीही शिंदेंपासून अंतर राखण्यास सुरूवात केली.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे बलस्थान
महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातून आपला राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या एकनाथ शिंदेंना आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे मॅसेंजर म्हणजे दूत म्हटले जात होते. कोणत्याही जिल्ह्यात राजकीय आणीबाणी उद्धवली तर ती सोडवण्याची जबाबदारी शिंदेंवर टाकली जात होती. त्याची एक झळक कोविड काळात पहावयास मिळाली.
गत 2 वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही मोठी बैठक घेतली नाही. तसेच ते आमदारांनाही फारसे भेटले नाही. ठाकरे यांच्याऐवजी शिंदे सातत्याने आमदारांची भेट घेत होते. त्यांच्या समस्या सोडवत होते. याच गोष्टीने त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास जिंकला व बंडखोरीसाठी तयार केले. ---------------------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.