आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • How Farmers' Incomes Will Double, Even The Most Recent Estimate Of Earnings Is Eight Years Old

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा प्रश्न...:शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे होईल दुप्पट, कमाईचा सर्वात अलीकडचा अंदाजही आठ वर्षे जुना

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • जुलै 2012 ते जून 2013 काळात संशोधन, तेव्हा मासिक उत्पन्न होते 6426 रुपये

केंद्र सरकार वारंवार दावा करत आहे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे त्यांचे उद्दिष्ट आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, सरकारकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची सर्वात ताजी जी आकडेवारी आहे तीही आठ वर्षे जुनी आहे. २०१३ च्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न ६४२६ आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितले की, सर्वात ताजी आणि शेवटची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या जुलै २०१२ ते जून २०१३ दरम्यान संशोधनात समोर आली. आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७७११२ रुपये म्हणजे दरमहा ६४२६ रुपये होते, तर शेतकरी कुटुंबाचा सरासरी मासिक खर्च ६२२३ रुपये आहे. यामुळे महिन्यात २०३ रुपयांची बचत होते.

खर्च वाढल्याने स्थिती झाली वाईट
आठ वर्षांपूर्वी ५२% शेतकरी कुटुंबांवर सरासरी ४७ हजार रुपयांचे कर्ज होते. नाबार्डच्या २०१६-१७ च्या सर्व्हेनुसार चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न २५०५ रुपये वाढले. महागाई दराच्या तुलनेत ही वाढही उणे होईल. तज्ञांनुसार, शेतकऱ्यांचा इनपुट खर्च वाढत असून जगणे महाग होत चालले आहे. यामुळे उत्पन्न दुप्पट करणे निरर्थक ठरेल. कारण, जगण्याचा खर्च जास्त वाढला तर चारपट उत्पन्न होऊनही गुणवत्ता वाढणार नाही.

उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अचूक मूल्यांकन हवे : सिंह
राजकीय व सामाजिक विश्लेषक एन. के. सिंह यांच्यानुसार सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेसह सध्याच्या उत्पन्नाचे अचूक मूल्यांकन करायला हवे होते. आठ वर्षे जुन्या अहवालातील आकडेवारीतून योग्य निष्कर्ष काढता येणार नाही. याबाबत स्थापन दलवाई समितीच्या २०१७ च्या अहवालानुसार उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ६.३९९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि कृषी निर्यात तीनपट वाढवावी लागेल.