आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातमध्ये ६ महानगरपालिका आणि ३१ जिल्हा परिषदांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. फेब्रुवारीमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत तिकिटाची मागणी करणाऱ्यांना भाजपकडून देण्यात येणारा अर्ज चर्चेचा विषय ठरत आहे. या अर्जामध्ये बायोडेटासह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सक्रियतेबाबत माहिती भरण्यास इच्छुकांना सांगण्यात आले आहे. तसेच राम मंदिर उभारणीसाठी राबवण्यात येणाऱ्या समर्पण निधीचीही माहिती मागण्यात आली आहे.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा मुख्यस्थानी राहावा ही आमची इच्छा आहे. जास्तीत जास्त समर्पण निधी गोळा करणारी व्यक्ती जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात आली असेल. म्हणजेच, ज्याने जितका जास्त निधी जमवला त्याने पक्षाचाही तेवढाच प्रचार केला असल्याचे ते म्हणाले. राज्यात एकूण सहा महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान तर २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल
अर्जांमध्ये या प्रश्नांचा आहे समावेश
- रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र निधीत किती योगदान दिले?
- समर्पण निधी २०१८ अंतर्गत किती योगदान दिले?
- सरकारी योजनांचा किती जणांना लाभ दिला?
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स किती?
मुलाखतीत पर्यवेक्षकांचे प्रश्न
- तुम्ही पक्षासाठी किती वर्षांपासून काम करत आहात?
- तिकीट नाही मिळाले तर काय कराल?
- तिकीट का हवे?
- तुमच्या जातीची किती मते आहेत?
- सध्या कुठली जबाबदारी आहे?
- निवडणूक कशी जिंकाल?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.