आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • How To Get Covacin? The Center Is Frequently Lowering Covacin Availability Figures ... Production Even Lower

भास्कर इनव्हेस्टिगेशन:कशी मिळेल कोव्हॅक्सिन? केंद्र वारंवार घटवत आहे कोव्हॅक्सिन उपलब्धतेचे आकडे...उत्पादन त्यापेक्षाही कमी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील मोठी लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती कायम राखणे गरजेचे होते. मात्र यात सर्वात मोठी अडकाठी लस उपलब्धतेच्या रूपाने समोर येत आहे. सरकारी दावे आणि वास्तव यामुळे लसीकरणाची गती मंदावत आहे. सरकारने लसींच्या नुकत्याच केलेल्या ऑर्डरनंतर माहिती दिली की, ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड एकूण ८८ कोटी डोसचे उत्पादन करेल. यातील ७५% केंद्र सरकार आण २५% खासगी रुग्णालयांसाठी असेल. यात ५० कोटी डोस कोविशील्ड आणि ३८ कोटी डोस कोव्हॅक्सिनचे असतील. तथापि हे आकडे कोव्हॅक्सिनच्या उपलब्धतेच्या मागील आकडेवारी आणि कंपनीच्या दाव्यापेक्षा खूप कमी आहेत. दै. भास्करच्या पडताळणीत सध्याच्या पायाभूत सुविधांनुसार ऑगस्ट-डिसेंबरदरम्यान ३८ कोटी डोसही मिळणे शक्य नाही. कोव्हॅक्सिनचे उत्पादन सध्या दरमहा २.५ कोटी आहे. जुलैमध्ये ते वाढून ७.५ कोटी आवश्यक होते. पण कंपनी २.५ कोटी डोसच पुरवत आहे.

केंद्र सरकारने २६ जून रोजी सुप्रीम कोर्टा दाखल केलेल्या पुरवणी शपथपत्रात जुलैमध्ये २ कोटी कोव्हॅक्सिनचे डोस मिळतील, असा दावा केला होता. उत्पादन वाढवण्यासाठी ज्या ३ कंपन्यांशी करार केला होता त्यातील २ कंपन्यांत अजूनही पायाभूत सुविधांवरच काम सुरू आहे. तिसऱ्या कंपनीनेच १५ जुलैपासून २० लाख डोस बनवण्यास सुरुवात कली आहे. भारत बायोटेकने सहायक कंपनी चिरोन बेहरिंगही जूनमध्ये उत्पादन सुरू करेल, असा दावा केला होता. पण तसे झाले नाही.

४ कंपन्या कोव्हॅक्सिन बनवतील...२ मध्ये यंदा उत्पादन कठीणच, एकीत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून निर्मिती होणार, केवळ १ मध्ये उत्पादन
हाफकिन, मुंबई
1.9 कोटी डोस दरमहा डिसेंबरमध्ये तयार होतील असा सरकारी दावा.
वास्तव :
जनरल मॅनेजर सुभाष शंकरवार म्हणाले की, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सुरू झाले आहे. पण प्रोजेक्ट प्लँटसह इतर बाबी सध्या अप्रूव्हल प्रोसेसमध्ये आहेत. उत्पादन कधी सुरू होईल याचे वेळापत्रक आम्ही तयार करत आहोत. याची घोषणा लवकरच करू.

बिबकोल, बुलंदशहर
1 कोटी डोस दरमहा डिसेंबरपासून उत्पादन हाेईल सरकारी दाव्यांनुसार.
वास्तव
: भारत बायोटेकची टीम लॅबचे भौतिक सत्यापनही करू शकली नाही. केंद्राचा ३० कोटींचा निधी लॅब व युनिटवर खर्च झाला आहे. बीएसएल-३ सुविधा निर्मितीसाठी अतिरिक्त निधी मागितला आहे. उपाध्यक्ष शुक्लांच्या मते डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरू होईल.

आयआयएल, हैदराबाद
50 लाख डोस दरमहा तयार करण्याचा भारत बायोटेकचा दावा आहे.
वास्तव :
इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि. (आयआयएल)चेे एमडी डॉ. आनंदकुमार यांच्या मते १५ जुलैपासून येथील एका युनिटमध्ये दरमहा २०-३० लाख डोसचे उत्पादन होत आहे. दुसरे युनिट तयार होत आहे. त्यानंतरच ५० लाख डोस उत्पादन शक्य आहे.

चिरोन बेहरिंग, गुजरात
2 कोटी डोस दरमहा या सहकारी कंपनीत बनवण्याचा भारत बायोटेकचा दावा.
वास्तव :
अंकलेश्वरमध्ये जूनमध्ये उत्पादन सुरू होणार होते. सूत्रांच्या मते कच्च्या मालाचा तुटवडा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत उत्पादन सुरू होईल. तथापि येथे वर्षात २० कोटी म्हणजे दरमहा १.६ कोटी डोस तयार होतील. ते कंपनीच्या दाव्यापेक्षाही कमी असतील.

ऑक्टोबरपासून ४.४० कोटी डोस दरमहा बनवू शकते कोव्हॅक्सिन...
भारत बायोटेकने आजवर आपल्या दरमहा लस उत्पादनाचे कोणतेच विवरण जाहीर केले नाही. अनधिकृत आकड्यांनुसार सध्या कंपनी दरमहा २.५ कोटी डोस तयार करत आहे. आयआयएलमध्ये दरमहा उत्पादन २० लाखांहून ३० लाख झाले आणि चिरोन बेहरिंगने ऑक्टोबरपर्यंत दरमहा १.६ कोटी डोस बनले तरी एकूण लस उपलब्धता ४.४० कोटी होईल. ऑगस्टपासूनच दरमहा ७.५ कोटी कोव्हॅक्सिनचे डोस बनतील, असा सरकारचा दावा आहे.

केंद्र वारंवार घटवत आहे कोव्हॅक्सिन उपलब्धतेचे आकडे...उत्पादन त्यापेक्षाही कमी
मेमध्ये ४९.१ कोटी : मे-जूनमध्ये केंद्राने लस उत्पादनाचा आराखडा सादर केला होता. त्यानुसार ऑगस्ट-डिसेंबरपर्यंत कोव्हॅक्सिनचे ४९.१ कोटी डोस मिळणार होते.
जूनमध्ये ४० कोटी : २६ जून रोजी केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल पुरवणी शपथपत्रात ऑगस्ट-डिसेंबरदरम्यान कोव्हॅक्सिनचे ४० कोटी डोस देण्याचा उल्लेख केला होता.
जुलैमध्ये ३८ कोटी : जुलैमध्ये केंद्राने सांगितले : ऑगस्ट-डिसेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन-कोविशील्डचे ८८ कोटी डोस तयार करू. यात कोव्हॅक्सिनचे ३८ कोटी डोस असतील.
कंपनीचा दावा १०० कोटींचा : भारत बायोटेकने २० मे रोजी दावा केला होता की, डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी एकूण १०० कोटी डोसचे उत्पादन करेल.

बातम्या आणखी आहेत...