आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Namaz At Home : How To Offer Eid Prayers At Home In Lockdown, What Does Islam Say About Offering Namaz At Home ? Learn The Whole Procedure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईदची नमाज घरीच:घरातच राहून अशी अदा करा ईदची नमाज; मशीद आणि ईदगाहपासून दूर एकट्यात नमाज अदा करण्याबद्दल काय सांगतो इस्लाम, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर नमाजच्या तुलनेत वेगळी असते रमजान महिन्यानंतर येणाऱ्या ईदची नमाज
  • सामान्य नमाजच्या तुलनेत ईदच्या नमाजमध्ये आहेत 6 अतिरिक्त तकबीर (अल्लाहू अकबर)

कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्यासाठी जगभरात लॉककडाउन असून लोकांच्या एकत्रित येण्यावर निर्बंध आहेत. प्रार्थना स्थळ आणि धार्मिक आयोजनांवर बंदी आहे. रमजानचा पूर्ण महिना लॉकडाउनमध्ये गेला. त्यात प्रथमच मुस्लिम समुदाय आपला सर्वात मोठा उत्सव असलेल्या रमजान ईद निमित्त मशीद किंवा ईदगाहवर न जाता घरातच नमाज अदा करणार आहेत. यासंदर्भाद इस्लाम आणि शरिअत (इस्लामी कायदा) काय म्हणतो? घरात ईदची नमाज नेमकी कशी करावी याचीच पद्धत मौलाना काझी नासेरुद्दीन यांनी सांगितली...

मौलाना काझी नासेरुद्दीन (इमाम, नांदेड) सांगतात, इस्लाम घरात नमाज अदा करण्याची परवानगी देतो. मोठा आजार, युद्ध किंवा कोरोना व्हायरस सारख्या परिस्थितीत जशा सर्व नमाज घरीच केल्या जात आहेत. त्याच पद्धतीने ईदची नमाज सुद्धा घरात अद केली जाऊ शकते.

ईदची नमाज समूहात (जमात) मध्ये अदा करायची असल्यास त्यासाठी किमान 3 ते 5 जण लागतील. यापैकीच एकाला इमाम करून त्यांच्या पाठीमागे नमाज अदा केली जाऊ शकते.

एकटेच असाल, समूह मिळाला नाही तर?

शरियतनुसार, कुणी खूप आजारी असल्यास किंवा मजबूर असल्यास त्यांना ईदची नमाज माफ राहील. त्यातच जर तुम्ही घरात एकटे असाल किंवा काही कारणास्तव समूहात सहभागी होण्यात असमर्थ ठरत असाल तर काझी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, जसे शुक्रवारची नमाज समूहात अदा करण्यापासून वंचित राहिल्यास घरातच दुपारच्या नमाज प्रमाणे ती अदा करता येते. तशाच प्रकारे रमजान ईदची नमाज सुद्धा घरात एकट्याने ईदच्या नमाजची नीयत करून अदा करता येऊ शकते. घरात दोन रकात किंवा चाष्त (चार रकात नमाज) अशा पद्धतीने ती अदा केली जाऊ शकते. एकट्यात ईदची नमाज करत असताना खुतबा (शुक्रवारच्या व ईदच्या नमाजवेळी दिले जाणारे विशेष उपदेश) न करता नमाजनंतर थेट दुआ केली जाऊ शकते.

ईदच्या नमाजची पद्धत

ईदची नमाज इतर नमाजपेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ शुक्रवारच्या नमाज आणि ईदच्या नमाजमध्ये दोन-दोन रकात असल्या तरीही ईदच्या नमाजमध्ये 6 अतिरिक्त तकबीर (अल्लाहु अकबर) असतात. सोबतच, शुक्रवारच्या नमाजमध्ये नमाज सुरू होण्यापूर्वी खुतबा केला जातो. तर ईदच्या नमाजमध्ये नमाज आणि दुआ यांच्या दरम्यान खुतबा केला जातो.

स्टेप -1

नमाज सुरू करण्यापूर्वी ही नमाज कशा निमित्त अदा केली जात आहे हे केवळ आपल्या कानांना ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणावे. ईद उल फित्रची नीयत - "नीयत करता हूं कि मैं ईद उल फित्र की दो रकात वाजीब नमाज की वासते अल्लाह के मुंह मेरा काबा-ए-शरीफ की तरफ।"

स्टेप - 2

नीयत म्हटल्यानंतर दोन्ही हाताचे पंजे खुले सोडून ते कानांपर्यंत न्यावे आणि अल्लाहु अकबर म्हणत हात खाली नेताना बांधावे. मग 'सना' उच्चारावे.

स्टेप -3

सना उच्चारल्यानंतर पुन्हा एकदा अल्लाहू अकबर म्हणत दोन्ही हात कानांपर्यंत न्यावे पण खाली नेताना हात बांधू नये, ते तसेच सोडून द्यावे. असेच पुन्हा एकदा अल्लाहु अकबर म्हणत हात कानांपर्यंत न्यावे आणि सोडून द्यावे. मग, तिसऱ्यांदा जेव्हा अल्लाहु अकबर म्हणत हात कानांपर्यंत न्याल तेव्हा हात बांधून घ्यावेत.

स्टेप -4

हात बांधल्यानंतर सूरे फातेहा उच्चारावे, त्यानंतर आणखी एक सूरा उच्चारावे. यानंतर रुकूमध्ये जावे आणि सजदा करावे. याच प्रकारे आपली एक रकात पूर्ण झाली.

स्टेप -5

दुसऱ्या रकातमध्ये जात अशाच प्रकारे सूरे फातेहा आणि एक सूरा पठण करावे. मग रुकूमध्ये जाण्यापूर्वी तीनदा अल्लाहू अकबर म्हणत हात कानांपर्यंत न्यावे आणि खाली सोडून द्यावे. चौथ्यांदा जेव्हा अल्लाहू अकबर म्हणाल तेव्हा हात उचलायचे नाहीत तर थेट रुकूमध्ये जायचे आहे. यानंतर दोन्ही सजदे करावेत आणि सलाम करून घ्यावे.

स्टेप - 6

सलाम झाल्यानंतर आता ईमाम असतील तर खुतबा पठण करतील किंवा उपदेश देतील. यानंतर दुआ करतील. पण, काही कारणास्तव एकटे असाल किंवा 3 पेक्षा कमी लोक असतील तर नमाज झाल्यानंतर थेट दुआ करावी.

दरवर्षी ईदची नमाज संपताच एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हटल्याशिवाय कुणालाही राहावत नाही. परंतु, कोरोना व्हायरसचा फैलाव पाहता आपल्याला या वर्षी सोशल डिस्टंन्सिंगची काळजी घ्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...