आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • How To Stop Corona Collar Tune ... Pranavada, Amit Shah; In The Top 10 Google Searches

दिव्य मराठी विशेष:कोरोना कॉलर ट्यून कशी रोखावी... प्रणवदा, अमित शहा; गुगल सर्चिंग टॉप-10मध्ये

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतसिंह व स्पुटनिक लसीचे सर्चिंग मोठ्या प्रमाणावर

गुगल ट्रेंड्सने ऑगस्ट २०२० चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतातील नागरिकांनी गुगलवर कोणकोणते की-वर्ड टाकले आणि सर्वाधिक काय सर्च झाले, याची माहिती दिली आहे. गुगल ट्रेंड्सनुसार रशियात तयार झालेली जगातील पहिली स्पुटनिक लस, सुशांतसिंह राजपूत व पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी-२० टॉप सर्चिंगमध्ये आहेत. एका महिन्यात स्पुटनिक, स्पुटनिक लस व सुशांतसिंह राजपूत सर्वाधिक वेळा म्हणजे ३३०० टक्के लोकांनी सर्च केले. स्वातंत्र्य दिन आणि प्रणव मुखर्जी यांनाही सर्च करण्यात आले. कोरोना कॉलर ट्यून कशी बंद करावी, गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय, कोरोना लस आधी कोण तयार करणार, यासारखे की-वर्ड गुगल सर्चिंग लिस्टच्या टाॅप-१० मध्ये आहेत.

टॉप-१० मध्ये सर्वाधिक सर्च केलेले की-वर्ड

१. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय?

२. कपड्यावर कोरोना विषाणू किती काळ राहतात?

३. रशियाने कोविड-लस तयार केलीय का?

४. जिओमध्ये कोरोना कॉलर ट्यून कशी बंद करावी?

५. भारतात कोरोना लस कधी तयार होईल?

६. शरीराचे दुखणे कोरोनाचे लक्षण आहे काय?

७. कोरोनात शरीराचे तापमान किती असते?

८. कोरोनाची लक्षणे किती दिवसांत दिसून येतात?

९. प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय?

१०. कोविड लसचा शोध कोण लावणार?

बातम्या आणखी आहेत...