आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात साडेतीन महिन्यांपासून रोज होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढल्या नाहीत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच रोज १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत होत्या. याउलट २० नोव्हेंबरला रोजची सरासरी १० लाखांपेक्षा कमी झाली. म्हणजे चाचण्या वाढण्याएेवजी स्थिर आहेत. आश्चर्य म्हणजे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेशात तर आता चाचण्या घटत आहेत. दिल्लीत तीन महिन्यांपूर्वीही रोज सरासरी ६२ हजार चाचण्या होत होत्या, तिसरी लाट आली असताना आताही तेवढ्याच होत आहेत. देशातील रोजचे २०% मृत्यूही आता दिल्लीतच होत आहेत. या सहा राज्यांत एकूण ५०.९० लाख रुग्ण आहेत, ते देशाच्या एकूण रुग्णांच्या ५५% आहेत.
देशात आतापर्यंत एकूण १३.४८ कोटी चाचण्या झाल्या. जगात सर्वाधिक १८.४४ कोटी चाचण्या अमेरिकेत झाल्या. लोकसंख्येच्या हिशेबाने अमेरिकेत ५५% लोकांच्या चाचण्या झाल्या, भारतात हा दर फक्त ९.७% आहे.
केंद्राचे नवे दिशानिर्देश : समारंभात २०० पेक्षा अधिक लोक एकत्र नकोत, राज्यांना ही संख्या १०० पेक्षाही कमी
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी नवे दिशानिर्देश जारी केले. ते १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहतील. त्यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासकांची असेल. कंटेनमेंट झोनची यादी जिल्हाधिकारी रोज अद्ययावत करतील.
- सिनेमा हॉल अजूनही ५०% प्रेक्षक क्षमतेने सुरू राहतील.
- स्विमिंग पूलमध्ये फक्त खेळाडूंचे प्रशिक्षण होऊ शकेल.
- धार्मिक, सामाजिक समारंभांत २०० पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. राज्ये ही संख्या १०० पेक्षाही कमी करू शकतात.
एक सल्लाही : ज्या शहरांत-भागांत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (संसर्गाचा दर) १०% पेक्षा जास्त आहे, तेथे कार्यालये, कारखाने, दुकाने आदींत कर्मचाऱ्यांची शिफ्ट वेगवेगळी करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.