आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Huge Collision Between Bus And Truck On Highway In Moradabad; 10 Dead, 10 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP मध्ये अपघात:मुरादाबादमध्ये हायवेवर बस-ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी; दाट धुक्यांमुळे झाला अपघात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद जिल्ह्याच्या नानपूर परिसरात शनिवारी सकाळी मिनी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. 10 जण जखमी झाले आहेत. यामधून काही गंभीर आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, दाट धुक्यांमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा अपघात मुरादाबाद-आग्रा हायवेवर झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, मिनी बसचा वेग खूप जास्त होता. ही बस मुरादाबाद येथून बिलारीकडे जात होती. ओव्हरटेक करत असताना ही पहिले एक मेटाडोरला धडकली, नंतर समोरुन येत असलेल्या ट्रकला धडकली.

घटनास्थळी स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटूंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.