आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांच्या यादीत नवीन 149 नावे:देशात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणारे 1103 नागरिक

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट-२०२२ प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी १०.९४ लाख कोटी संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी(७.९४ लाख कोटी) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशाच्या १२२ शहरांमध्ये १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणारे ११०३ लोक आहेत. यादीतील नव्या १४९ लोकांमध्ये २० केमिकल उद्योगातील आहेत. सर्वात जास्त १२६ नावे औषध निर्मिती उद्योगातील आहेत. या १४९ जणांची एकूण संपत्ती ३,१८,२०० कोटी रु. आहे. या वर्षी २२१ अब्जाधीश असून २०२१ च्या यादीपेक्षा १६ कमी आहेत. यादीत ४३ रिअल इस्टेट विकासकांनी स्थान प्राप्त केले आहे. डीएलएफचे राजीव सिंह आणि त्यांचे कुटुंब ६१,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह रिअल इस्टेट विकासकांमध्ये अव्वल आहेत. ते भारतीय श्रीमंतांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत.

टॉप-१० श्रीमंतांच्या एकूण संपत्तीत ५९% वाटा अदानी आणि अंबानी यांचा आहे नाव संपत्ती वाढ/घट गौतम अदानी 10,94,400 +116% मुकेश अंबानी 7,94,700 +11% सायरस पूनावाला 2,05,400 +25% शिव नादर 1,85,800 -21% राधाकिशन दमानी 1,75,100 +13% विनोद शांतिलाल अदानी 1,69,000 +28% एसपी हिंदुजा 1,65,000 -25% एलएन मित्तल 1,51,800 -13% दिलीप सांघवी 1,33,500 +12% उदय कोटक 1,19,400 +3% (संपत्ती कोटी रुपयांत, वाढ/घट 2022 मध्ये आतापर्यंत)

छोट्या शहरांत वाढले श्रीमंत
नाव संपत्ती शहर
आचार्य बाळकृष्ण 32,400 हरिद्वार
जॉय अलुक्कास 25,700 त्रिसूर
केसी नुवाल-फॅमिली 9,200 भिलवाडा
एम रुंगटा-फॅमिली 7,300 प.सिंहभूम
संजय पटवारी 5,600 झारग्राम
अलख पांडेय 4,000 प्रयागराज
राकेश कुमार 2,700 हिसार
अशोक पाटणी 2,600 अजमेर
एचसी गर्ग 1,900 पानिपत
जयंती सिन्हा 1,700 बेगूसराय

बातम्या आणखी आहेत...