आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Husband Sharing Is Not Acceptable To Indian Women, Allahabad High Court Observes, Latest News And Update

महिला पतीला शेअर करु शकत नाहीत:​​​​​​​अलाहाबाद हाय कोर्टाचे निरिक्षण; म्हणाले -पती शेअर करणे भारतीय महिलांना अमान्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील महिला आपल्या पती प्रकरणी अत्यंत पझेसिव्ह असल्याचे महत्वपूर्ण निरिक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणात सुनावणी करताना नोंदवले. ते म्हणाले -'भारतीय महिला आपल्या नवऱ्यांप्रती अत्यंत पझेसिव्ह असतात. त्या पतीला कुणासोबतही शेअर करु शकत नाहीत.'

वाराणसीच्या मडुआडीह पोलिस ठाण्यात एका महिलेच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल होता. त्यात तिचा पती सुशील कुमार यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. पतीने याविरोधात एक याचिका दाखल केली होती. अलाहाबाद हाय कोर्टाने सोमवारी सुशील कुमार व अन्य 6 जणांनी दाखल केलेली याचिका धूडकावून लावली.

पतीचे तिसरे लग्न, दुसऱ्या पत्नीने घेतले विष

वाराणसीच्या मंडुआडीह पोलिस ठाण्यात एका महिलेने आपला पती सुशील कुमार व त्याच्या कुटूंबातील 6 सदस्यांविरोधात भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात पीडितेला इजा पोहोचवणे, धमकावणे व पुन्हा लग्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पती व सासरच्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपीने प्रथम कनिष्ठ न्यायालयात डिस्चार्ज याचिका दाखल केली. ती फेटाळण्यात आली. त्यानंतर त्याने अलाहाबाद हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

हाय कोर्ट म्हणाले -महिला पतीविषयी पझेसिव्ह असतात

न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी म्हणाले -'भारतीय महिला आपल्या पतीविषय़ी अत्यंत पझेसिव्ह असतात. कोणत्याही विवाहित महिलेला आपल्या पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न करणे मान्य नसते. अशा प्रकरणांत महिलेकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणे अवघड असते. या प्रकरणातही असेच झाले. आरोपी सुशील कुमारने तिसरे लग्न केले होते. त्यामुळे याच कारणामुळे त्याच्या पत्नीने आत्महत्या केली हे स्पष्ट आहे.'

बातम्या आणखी आहेत...