आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:ट्रिपल तलाक प्रकरणात पतीचे नातलग जबाबदार नाहीत : सर्वाेच्च न्यायालय

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रिपल तलाक प्रकरणात जबाबदार पतीच्या नातेवाइकांना आरोपी मानले जाऊ शकत नाही. अशा प्रकरणांत अटकपूर्व जामीन देण्यावर कसलीही बंदी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने सांगितले की, ‘ट्रिपल तलाक प्रकरणात कायद्यानुसार गुन्हा मुस्लिम पुरुषाने केला आहे. यामुळे त्याची आई किंवा इतर नातेवाइकांना आरोपी ठरवले जाऊ शकत नाही.’ कोर्ट म्हणाले की, ‘अशा प्रकरणात जामीन देण्यावर कसलीही बंदी नाही. मात्र संबंधित न्यायालयात जामिनाचा आदेश देण्याआधी तक्रार करणाऱ्या महिलेचे म्हणणेही ऐकून घेतले जावे. अटकपूर्व जामिनाचा आदेश संबंधित न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून आहे.’

आरोपीच्या आईची सुप्रीम कोर्टात धाव
कोर्टाने पीडित महिलेच्या सासूला अटकपूर्व जामीन मंजूर करत ही टिप्पणी केली. या प्रकरणात केरळ हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने आरोपीच्या आईने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यात पीडित महिलेच्या सासूला आरोपी केले होते. त्यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...