आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोस्ट फ्लाईट:प्रवासी ज्या विमानाची तिकिटे घेऊन वाट पाहत होते, ती फ्लाईटच नव्हती!

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोमवार 31 ऑक्टोबरचा दिवस.. दिल्लीसाठी गो फर्स्ट फ्लाईटचे तिकिट बूक करणारे प्रवासी विमानतळावर आले असता सुरक्षा रक्षक त्यांना गेटवर अडवतात. कारण सांगतात की, त्यांच्या हातात जे तिकिट आहे, तशी कोणतीही फ्लाईट विमानतळावरून नाही. विशेष म्हणजे ही सर्व तिकिटे व्हॅलिड होती आणि त्यावर PNR क्रमांकही होता, पण ही तिकिटे जारी करणाऱ्या एअरलाईनचे ऑपरेशन महिनाभरापूर्वीच बंद झाले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रवाशांनी आता एअरलाईनवर फसवणुकीचा आरोप केला आहे आणि DGCA कडे एअरलाईनवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एअरलाईन्सची तिकिटे जारी करणारे पोर्टल हॅप्पी फेअर्सवरही कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. गुवाहाटीतील या पोर्टलने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही तिकिटे जारी केली होती. वास्तविक या एअरलाईनची सेवा 1 ऑक्टोबरलाच संपली होती.

अनेक प्रवाशांनी तिकिटासाठी मोजले दुप्पट पैसे

सर्व प्रवासी एका ग्रुप तिकिटाचा भाग होते, ज्यात 10 प्रवाशांचा समावेश होता. यापैकी अनेकांनी तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजले होते. विमान कंपनीची सेवाच बंद झाल्याबद्दल या प्रवाशांना जेव्हा कळाले, तेव्हा त्यांनी गो फर्स्टला अनेक कॉल आणि मेसेज केले, ज्याचे काहीही उत्तर मिळाले नाही.

गुवाहाटीतील ऑनलाईन पोर्टल हॅप्पी फेअर्सने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही तिकिटे जारी केली होती. मात्र या एअरलाईनची सेवा 1 ऑक्टोबरलाच सस्पेंड झाली होती.
गुवाहाटीतील ऑनलाईन पोर्टल हॅप्पी फेअर्सने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही तिकिटे जारी केली होती. मात्र या एअरलाईनची सेवा 1 ऑक्टोबरलाच सस्पेंड झाली होती.

गो फ्लाईटच्या सब-एजंटकडून चुकीची कबुली

तिकिटावरील नंबरवर कॉल केल्यावर गो फर्स्टचे सब-एजंट गोफ्लायस्मार्टचे मालक अंकित अग्रवाल यांनी फोन रिसीव्ह केला. ते म्हणाले की, ते एअरलाईनकडून तिकिट विकत घेत ते हॅप्पी फेअर्सला विकतात. त्यांनी सांगितले की, 26 ऑक्टोबरला एअरलाईनने त्यांना एक ई-मेल पाठवला होता, ज्यात लिहिले होते, 31 ऑक्टोबरची हैदराबाद-दिल्ली फ्लाईट ऑपरेशनल कारणांमुळे बदलण्यात आली आहे. पण PNR गो फर्स्ट वेबसाईटवर लाईव्ह झाले होते, यामुळेच आम्हाला वाटले की फ्लाईट ऑपरेट होईल. नक्कीच काहीतरी चूक झाली आहे.

प्रवाशांनी केली नुकसान भरपाईची मागणी

27 ऑक्टोबरला तिकिट बूक करणारे सिव्हिल इंजिनिअर राम कुमार म्हणाले की, 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि खूप तक्रारी केल्यानंतरही अजूनपर्यंत रिफंड आणि नुकसान भरपाईविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. आम्हाला अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल कंपनीने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सोशल मीडियावर या एअरलाईनविषयी सर्च केल्यावर कळाले की, इतरही अनेक प्रवाशांनी हैदराबाद, बंगळुरू आणि इतर शहरांमधूनही अशाच तक्रारी केल्या आहेत.

ऑनलाईन पोर्टल मालक म्हणाले वेबसाईटवर PNR लाईव्ह आहे

तिकिट जारी करणारे ऑनलाईन पोर्टल हॅप्पी फेअर्सचे मालक शांती जैन म्हणाले की, आम्ही कबुल करतो की फ्लाईट 29 ऑक्टोबरपर्यंत सस्पेंडेड होती, पण त्यानंतर त्यांची सेवा पुन्हा सुरु होणार होती. आताही गो फर्स्टच्या वेबसाईटवर PNR दिसत आहेत. यामुळे आम्हाला कळाले नाही की फ्लाईट ऑपरेशनल नाही. मात्र त्यांनी रिफंड आणि नुकसान भरपाईविषयी काहीही सांगितले नाही.

बातम्या आणखी आहेत...