आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Coronavirus News; Covid 19 Virus Found In Hussainsagar Nacharam Lake And Nizam Talab; News And Live Updates

महामारीतील धक्कादायक स्टडी:हैदराबादच्या हुसेन सागर तलावामध्ये आढळले कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल; परंतु संसर्गाचा धोका नाही

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही

देशात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच हैदराबाद येथील हुसेन सागर तलावामध्ये कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळले आहे. हे एका अभ्यासातून समोर आले आहे. परंतु, त्या स्टडीमधून कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल पाण्यामधून संक्रमित होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय हे जेनेटिक मटेरियल हैदराबादमधील हुसेन सागर तलावासह नाचाराम पेड्डा चेरुवा आणि निजाम तलावामध्येदेखील आढळले आहे. याची सुरुवात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत झाली असून पाण्यामध्ये मिसळण्याचे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात वाढले असल्याचे स्टडीमधून समोर आले आहेत.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था, सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र, वैज्ञानिक आणि अभिनव संशोधन अकादमी यांनी मिळून हा स्टडी केला आहे. 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालेल्या या स्टडीमध्ये पहिल्यांदा कोरोनाची पहिल्या आणि दुसर्‍या लाटेला कव्हर करण्यात आले आहे.

पाण्यात सापडलेल्या मटेरियलवरुन पुढील लाटेचा अंदाज बांधणे शक्य
या स्टडीनुसार, लोकांच्या वस्तीतून जे अनट्रीटेड आणि घाणरडे पाणी आले, त्याव्दारे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये मिसळले आहे. अशावेळी सध्यातरी कोरोना व्हायरसचा प्रसार होत नसल्याचे समोर येत आहे. परंतु, यामुळे सध्याच्या लाटेच्या परिणामाचा आणि येणार्‍या लहरीचा अंदाज बांधता येऊ शकतो.

दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही
यावर जगातील दुसर्‍या देशातही स्टडी होत असल्याचे सीसीएमबीच्या संचालकाने एका वेबसाइटला बातमी देताना सांगितले. परंतु, पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा अद्याप नसल्याचे ते म्हणाले. अशावेळी पाण्याद्वारे चेहरा किंवा तोंडातून संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...