आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Gang Rape Case Police Seize Mercedes, Arrest 2 Suspects | Marathi News

हैदराबाद गँगरेप प्रकरणी कारवाई:पोलिसांनी मर्सिडीज ताब्यात घेतली, 2 आरोपींना अटक; तीन VIPच्या मुलांचाही रेपमध्ये सहभाग

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींची ओळख पटवली असून, त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारात सहभागी असलेले 3 आरोपी अल्पवयीन असून, त्यांची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींची पार्श्वभूमी राजकीय प्रभावाची असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेजही लागले आहे.

28 मे रोजी ही घटना घडली होती. मुलीच्या वडिलांनी बुधवार, 1 जून रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हैदराबादमधील जुबली हिल्स पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने फक्त एका आरोपीचे नाव सांगितले : पोलीस
या घटनेचा तपास करत असलेले हैदराबाद पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला आरोपीबद्दल फारशी माहिती नाही. तिने एकच नाव सांगितले आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यातून 5 आरोपींची ओळख करण्यात आली आहे.

जोएल पुढे म्हणाले - दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांच्या मुलाचा यात सहभाग असल्याचा आरोप निराधार आहे. एक व्हीआयपीचा मुलगा असून, अल्पवयीन असल्याने त्याला रात्री ताब्यात घेण्यात आले नाही. आमदार मुलाचे नावही समोर आले होते. व्हिक्टिमचे म्हणणे आणि सीडीआरच्या विश्लेषणावरून तो पाच आरोपींमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पबच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले
पबमधून बाहेर पडणाऱ्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पीडिता मुलांसोबत निघताना दिसत आहे. ते पबच्या बाहेर उभे राहून बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, मुलगी मित्राला मिठी मारताना, त्याला निरोप देताना आणि बाकीच्या मुलांसोबत लाल मर्सिडीजमधून निघताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...