आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Gangrape Of A Minor Girl In A Mercedes All Boys Of Political Background | Marathi News

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप:हायप्रोफाइल पार्टीला गेली होती मुलगी, सर्व आरोपी अल्पवयीन मुले राजकीय पार्श्वभूमीची

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मर्सिडीजमध्ये 5 अल्पवयीन मुलांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींपैकी एक आमदाराचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, गँगरेपमध्ये त्याच्या सहभागाला पोलिसांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. आरोपी हे इयत्ता 11वी-12वीचे विद्यार्थी असून सर्वांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

28 मे रोजी ही घटना घडली होती. मुलीच्या वडिलांनी बुधवार, 1 जून रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी ज्युबिली हिल्स पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

पबमध्ये होती हाय प्रोफाईल पार्टी

मुलीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये सांगितले की, 28 मे रोजी त्यांची 17 वर्षांची मुलगी एका हायप्रोफाइल पार्टीला गेली होती. पार्टीचे आयोजन त्यांच्या मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी एम्नेशिया अँड इनसोम्निया पबमध्ये केले होते. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की सायंकाळी साडेपाच वाजता ती घरातुन निघाली. पबमध्ये भेटलेल्या आरोपींनी तिला घरी सोडणार असल्याचे सांगितले. म्हणून ती गाडीत बसली. ज्यात 3-4 मुले आधीच बसली होती.

वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणाही आहेत. या घटनेपासून पीडित तरुणी भीतीखाली आहे. ती संपूर्ण घटना उघडपणे सांगू शकत नाहीये. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे पीडितेच्या वडिलांनी मागणी केली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले - 'अंधारात एका निर्जन ठिकाणी गाडी थांबली तेव्हा या मुलांनी एकामागून एक मुलीला मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी घटना करण्यापूर्वी पेस्ट्री शॉपमध्ये गेले होते.

पीडित मुलगी फक्त एका आरोपीला ओळखू शकते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत अल्पसंख्याक मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलासह आमदाराच्या मुलाचाही समावेश होता. सध्या पीडित मुलगी फक्त एका आरोपीला ओळखू शकते आणि त्याचे नाव देऊ शकते. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी कलम बदलून बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पब पार्टीशी संबंधित लोक आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

ही नॉन-अल्कोहोल पार्टी होती, असे पब व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तेथे आलेल्या लोकांना दारू दिली जात नव्हती. जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...