आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hyderabad | GHMC Election | BJP | AIMIM | TRS | Politics | Shah Reaches Hyderabad, Worshiped At Bhagyalakshmi Temple Before Road Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात अमित शाह:KCR आणि ओवैसींनी आपापसात जागा वाटून घेतल्या; हैदराबाद नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाहंचे टीकास्त्र

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात अमित शाह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हैदराबादला घराणेशाहीतून मुक्त करायचे आहे'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी(दि.29) हैदराबादमध्ये आले होते. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अमित शाह यांनी सिकंदराबादमध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील तेलंगाणा राष्ट्र समिती (TRS) सरकारवर टीकास्त्र दागले. यावेळी शाह म्हणाले की, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ओवैसींच्या पक्षासोबत करार केला, यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही. लोकशाहीत कोणताही पक्ष कोणासोबतही येऊ शकतो. समस्या अशी आहे की, तुम्ही एका खोलीत बसून कोणालाही काही कळू न देता जागांचे विभाजन केले.

ओवैसीकडून अवैध रोहिंग्या मुस्लिम शहरात असल्याच्या प्रश्नावर शाह म्हणाले की, जेव्हा मी अॅक्शन घेतो, तेव्हा ते संसदेत गोंधळ करतात. त्यांनी मला लिहून द्यावे की, रोहिंग्या आणि बांग्लादेशींना काढले जावे. संसदेत त्यांची बाजू कोण घेतं ?

शाहंनी TRS वर साधला निशाना

शाह पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या एक लाख घरांच्या आश्वासनाचे काय झाले ? 10 हजार कोटी रुपयांची योजना तुम्ही (TRS) घेऊन आला होता, त्याचे काय झाले. हुसैन सागरला टूरिस्ट स्पॉट बनवण्याचे वचन दिले होते, त्याचे काय झाले ? तुम्ही काहीच केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष्मान योजना आणली होती. पण, मोदीजी हैदराबादमध्ये लोकप्रिय होतील, या भीतीने तुम्ही ती राज्यात लागू केली नाही.

औवैसींवर टीका

असदुद्दीन ओवैसींवर शाह म्हणाले की, जेव्हा ते फॉर्महाउसमधून निघतील, तेव्हाच विकास होईल. जेव्हा हैदराबाद बुडले होते, तेव्हा ओवैसी कुठे होते? तुम्ही फक्त कुटुंबातील व्यक्तीलाच प्राधान्य का देता. आम्हाला हैदराबादला निझाम संस्कृतीतून मुक्त करुन लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आधुनिक शहर बनवायचे आहे. आम्हाला येथील राजकारणाला घराणेशातून मुक्त करायचे आहे.

शनिवारी योगी हैदराबादेत आले होते

हैदराबादेतील निवडणुकीसाठी अनेक मोठे भाजप नेते येत आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील प्रचारसाठी हैदराबादेत दाखल झाले होते. योगींनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याबाबत भाष्य केले. यापूर्वी भाजपाध्यक्ष जेपी नड्डांनी शुक्रवारी रोड शो केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser