आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणाच्या मंत्र्याचा तालिबानी नारा:कामगार मंत्री म्हणाले - 6 वर्षांच्या मुलीचा बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, त्याला पकडून त्याचा एन्काउंटर करु

हैदराबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वी दिशा बलात्कार प्रकरणातील आरोपींचाही झाला होता एन्काउंटर

तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ल रेड्डी यांच्या वक्तव्याने सर्वच चकीत झाले आहेत. रेड्डी यांनी बलात्काराच्या आरोपीला एन्काउंटरमध्ये ठार करण्याची घोषणा जनतेसमोर केली आहे. मंगळवारी मेडचल-मलकाजगिरि जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. या दरम्यान, जेव्हा 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या संदर्भात त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हे विधान केले.

रेड्डी म्हणाले- बलात्काराचा 30 वर्षीय आरोपी नक्कीच पकडला जाईल आणि त्याला एन्काउंटरमध्ये मारुन टाकले जाईल. त्याला सोडण्याचा प्रश्नच नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्याची सुनावणी जलदगतीने केली जाईल. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटू. त्यांना मदत करु आणि भरपाई देखील दिली जाईल.

काँग्रेस खासदारानेही एन्काउंटरविषयी सांगितले
केवळ रेड्डीच नाही, मलकाजगिरि काँग्रेस खासदारही आरोपींच्या एन्काउंटरविषयी बोलले होते. पीडित कुटुंबाला भेटून परतत असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

शेजाऱ्यावरच मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप
9 सप्टेंबर रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. या प्रकरणात एक शेजारी आरोपी आहे. तेलंगना पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी 15 टीम तयार केल्या आहेत आणि या टीम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पाठवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या आरोपीबद्दल कोणतीही माहिती देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कँडल मार्चही काढण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी दिशा बलात्कार प्रकरणातील आरोपींचाही झाला होता एन्काउंटर
27 नोव्हेंबर 2019 रोजी रुग्णालयातून घरी परतणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर तेलंगणामध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. यानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली आणि नराधमांनी पीडितेचा मृतदेह जाळला. या प्रकरणातील आरोपी चार लॉरी ड्रायव्हर आणि क्लीनरांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. शादनगरमधील चतनपल्ली येथे हा एन्काउंटर झाला होता, जिथे बलात्काऱ्यांनी डॉक्टर महिलेचाचा मृतदेह जाळला होता. सकाळी ही बातमी पसरताच रस्त्यापासून संसदेपर्यंत आणि सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांचे कौतुक केले होते, पण पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले गेले.

या घटनेनंतर सुमारे 10 तासांनी तेलंगणाचे पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार पुढे आले होते आणि म्हणाले, 'कायद्याने आपले काम केले. हा एन्काउंटर नव्हता. आरोपींनी आत्मसमर्पण करावे अशी आमची इच्छा होती, पण ते तयार झाले नाहीत आणि क्रॉस फायरिंगमध्ये मारले गेले.

बातम्या आणखी आहेत...