आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद बलात्कार प्रकरण:मंत्र्याने म्हटले होते बलात्काऱ्याचा एन्काउंटर करू, तिसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह; 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, हत्येचा होता आरोपी

हैद्राबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्र्याव्यतिरिक्त काँग्रेस खासदाराने एन्काउंटरविषयी केले होते भाष्य

तेलंगणामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. पोलिसांनी शरीरावर असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली आहे. हा मृतदेह हैदराबादच्या सिंगारेनी कॉलनीतील बलात्कार आणि हत्येचा आरोपी पी राजू (30) याचा असल्याची माहिती तेलंगणाच्या डीजीपीने दिली आहे. आरोपीचा मृतदेह सापडल्याने विरोधक हैदराबाद पोलिस आणि सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत, कारण दोन दिवसांपूर्वी राज्याचे कामगार मंत्री मल्ल रेड्डी म्हणाले होते की, आम्ही आरोपींचे एन्काउंटर करुन मारुन टाकू.

मंत्र्याव्यतिरिक्त काँग्रेस खासदाराने एन्काउंटरविषयी केले होते भाष्य
मल्ला रेड्डी मंगळवारी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यात आले होते. तिथे ते म्हणाले होते की - बलात्काराचा 30 वर्षीय आरोपी निश्चितपणे पकडला जाईल आणि तो एन्काउंटरमध्ये मारला जाईल. त्याला सोडण्याचा प्रश्नच नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्याची सुनावणी जलदगतीने केली जाईल. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटू. त्यांना मदत करु आणि भरपाई देखील दिली जाईल.

काँग्रेस खासदारानेही एन्काउंटरविषयी सांगितले
केवळ रेड्डीच नाही, मलकाजगिरि काँग्रेस खासदारही आरोपींच्या एन्काउंटरविषयी बोलले होते. पीडित कुटुंबाला भेटून परतत असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

शेजाऱ्यावरच मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप
9 सप्टेंबर रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या युवकावर आरोप होता. तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी 15 टीम तयार केल्या होत्या आणि या टीम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या आरोपीबद्दल कोणतीही माहिती देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कँडल मार्चही काढण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी दिशा बलात्कार प्रकरणातील आरोपींचाही झाला होता एन्काउंटर
27 नोव्हेंबर 2019 रोजी रुग्णालयातून घरी परतणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर तेलंगणामध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. यानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली आणि नराधमांनी पीडितेचा मृतदेह जाळला. या प्रकरणातील आरोपी चार लॉरी ड्रायव्हर आणि क्लीनरांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. शादनगरमधील चतनपल्ली येथे हा एन्काउंटर झाला होता, जिथे बलात्काऱ्यांनी डॉक्टर महिलेचाचा मृतदेह जाळला होता. सकाळी ही बातमी पसरताच रस्त्यापासून संसदेपर्यंत आणि सोशल मीडियावर लोकांनी पोलिसांचे कौतुक केले होते, पण पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले गेले.

या घटनेनंतर सुमारे 10 तासांनी तेलंगणाचे पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार पुढे आले होते आणि म्हणाले, 'कायद्याने आपले काम केले. हा एन्काउंटर नव्हता. आरोपींनी आत्मसमर्पण करावे अशी आमची इच्छा होती, पण ते तयार झाले नाहीत आणि क्रॉस फायरिंगमध्ये मारले गेले.

बातम्या आणखी आहेत...