आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Heart Attack Death Video; Man Death While Playing Badminton | Secunderabad

बॅडमिंटन खेळताना अचानक हार्ट अटॅक:रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू; अकाली जाण्याने कुटुंबीयांना धक्का

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्ली चालता चालता, डान्स करताना हार्ट अटॅकला बळी पडलेल्या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. अशीच एक ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली आहे. बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बॅडमिंटन खेळताना श्याम यादव हे अचानक कोसळले. रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.
बॅडमिंटन खेळताना श्याम यादव हे अचानक कोसळले. रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हैदराबादच्या लालपेट येथे 38 वर्षीय श्याम यादव हे नेहमीप्रमाणे कार्यालयातून आल्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले होते. मात्र हा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. बॅडमिंटन खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले. तातडीने साथीदारांनी त्यांना रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी श्यामला मृत घोषित केले.अतिशय तंदुरुस्त असलेल्या शाम यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

लग्नात नवऱ्या मुलाला लावत होता हळद; हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदलले

नवऱ्या मुलाला हळद लावताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. मोहम्मद रब्बानी असे या 40 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. रब्बानी गुलजार हाऊस येथे दागिन्यांच्या दुकानात काम होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. लग्नघरात मृत्यू झाल्याने संपुर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदलले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

क्रिकेट खेळता-खेळता हार्ट अटॅकने मृत्यू

गुजरातमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान एका GST अधिकाऱ्याचा अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ इंटरनेटवर समोर आले आहेत. हृदयविकाराचा झटका लोकांना अचानक मृत्यूच्या जाळ्यात ओढत आहे. हृदयविकार हा जरी वृद्धांसाठी धोका मानला जात असला तरी आता तरुणही हृदयविकाराच्या विळख्यात सापडत आहेत. डब्ल्यूएचओ आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली आहे. तर हृदयविकार हे जगातील आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. दुसरीकडे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दशकांत भारतात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. प्रसिद्ध डॉक्टर रमाकांत पांडा म्हणतात की 1990 च्या दशकात भारतातील एकूण मृत्यूंपैकी 14-15% मृत्यूंचे कारण हृदयरोग होते, जे आता जवळजवळ दुप्पट होऊन 25% झाले आहे.

जाणून घेऊया हृदयविकाराच्या सुरुवातीला दिसणारी लक्षणे

बातम्या आणखी आहेत...