आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Mother & Daughter Qualified Fitness Tests For Police Sub Inspector Posts | Hyderabad News

आई अन् मुलीच्या जिद्दीला सलाम:एकाचवेळी दोघींनी फिजिकल टेस्ट केली पास, बनल्या पोलिस अधिकारी, हैदराबादची घटना

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर एखाद्याने निश्चय केला तर काहीही करू शकतो. मात्र, निश्चय तेवढा पक्का आणि त्याला परिश्रमाची जोड देण्याची गरज आहे. अशीच एक अशक्य गोष्ट हैदराबादमधील माय-लेकींनी करू दाखविली आहे. दोघी माय-लेकी पोलिस भरतीच्या शारिरीक चाचणीत यशस्वी झाल्या आणि एकाच वेळी आई आणि मुलगी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवडल्या गेल्या आहेत.

ही यशस्वी कहाणी आणि जिद्दीची कहाणी आहे. हैदराबादमधील माय-लेकीची. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हैदराबादमधील खम्मम भागात राहणाऱ्या मायलेकींनी चांगले गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदाची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. 38 वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबल थोला नागमणी आणि त्यांची 21 वर्षीय मुलगी थोला त्रिलोकिनी असे यश संपादन करणाऱ्या दोघींचे नाव आहे.

सर्वत्र कौतुकांचा वर्षाव, म्हणाले-जिद्दीला सलाम

आई मुलगी परीक्षेत यशस्वी झाल्यामुळे कुटुंबियांक़डून आनंद व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर हैदराबाद मधील आप्तस्वकीयांसह सोशल मीडियावर देखील या मायलेकींचे कौतुक केले जात आहे. थोला नागमणी म्हणाल्या की, मला अभिमान वाटत आहे की, माझ्या मुलीची देखील निवड झाली आहे. त्याचदिवशी मी देखील पदौन्नतीसाठी परीक्षा दिली होती. यात मला यश मिळाले आहे. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, येत्या काळात मी आणि माझी मुलगी दोघीही पोलिस अधिकारी म्हणून काम करणार आहोत.

पोलिस उपनिरीक्षक पदाची भरती

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ही भरती झाली आहे. तसेच कॉन्स्टेबल पदांवरील पदौन्नतीसाठी देखील या ठिकाणी शारिरीच चाचणी घेण्यात आली. कॉन्स्टेबल थोला नागमणी ​​​​​​ यांनी पदौन्नतीसाठी यावेळी फिटनेस टेस्ट दिली. तर त्यांची मुलगी त्रिलोकिनीने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारिरीक टेस्ट झाली. या दोघींनाही एकाच मैदानावर चांगले गुण मिळाले आहे. त्यामुळे एकाच वेळी मुलगी आणि आई पोलिस उपनिरीक्षक कॅडेटचे प्रशिक्षण पूर्ण करून अधिकारी बनणार आहे.

बातम्या आणखी आहेत...