आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad University Thai Student Sexual Assault Case Updates, Accused Professor Arrested, Suspended After Students Protest

थायलंडच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला अटक:पुस्तक देण्याच्या बहाण्याने घरी नेले; हैदराबाद विद्यापीठाने केले निलंबित

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • University of Hyderabad, Professor arrested, Foreign student, Thai student molested, Student from Thailand, Cyberabad police

हैदराबाद विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला परदेशी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, शुक्रवारी प्राध्यापक तिला पुस्तक देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने बळजबरी केली. विद्यापीठाने प्राध्यापकाला निलंबित केले आहे.

विद्यार्थिनीला येते फक्त थाई भाषा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी विभागाचे प्राध्यापक रवी रंजन (62) हे विद्यार्थिनीला दुपारी चारच्या सुमारास घरी घेऊन गेले. रात्री नऊच्या सुमारास त्याने तिला विद्यापीठात सोडले. तिच्या मैत्रिणींनी विद्यार्थिनीला पाहिले तेव्हा ती रडत होती. कारण विचारले असता तिने सांगितले की, प्रोफेसरने तिचा लैंगिक छळ केला. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीला फक्त थाई भाषा येते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठाने प्राध्यापकाला निलंबित केले

ही घटना उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी करत निदर्शने केली. विद्यार्थी संघटनेने सांगितले की, विद्यार्थी रात्रभर रजिस्ट्रारला कॉल आणि मेसेजेस पाठवत राहिले, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

विद्यापीठ न्यायाधिकरणाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून कारवाई करण्यास विलंब केला, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्राध्यापकाच्या अटकेनंतर आणि निदर्शने केल्यानंतर विद्यापीठाने प्राध्यापकाला निलंबित केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

जम्मू-काश्मिरातही विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी प्राध्यापकाला अटक

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठातील एका प्राध्यापकाला शुक्रवारी रात्री एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अटक करण्यात आली. विद्यापीठात प्राध्यापकाच्या विरोधात निदर्शने सुरू झाल्यानंतर विद्यापीठाने त्याला निलंबित करून याची चौकशी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...