आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबादेतील महानगरपालिका निवडणुकांत भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डांनंतर शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मल्काजगिरीमध्ये रोड शो केला. त्यात ते म्हणाले, “एका परिवार आणि मित्रमंडळाला लूटमारीचे स्वातंत्र्य द्यायचे की हैदराबादला पुन्हा विकासाच्या नव्या वाटांवर न्यायचे, हे आपल्याला ठरवावे लागेल. मला माहीत आहे की येथील सरकार एकीकडे जनतेची लूट करत आहे तर दुसरीकडे, एमआयएमच्या (ओवेसींचा पक्ष) सांगण्यावरून भाजप कार्यकर्त्यांचा छळ करत आहे. या लोकांविरुद्ध नवा लढा लढण्यासाठी मी तुमच्यासोबत भगवान श्रीरामांच्या भूमीवरून इथे आलो आहे.’ १५० जागांच्या हैदराबाद मनपासाठी १ डिसेंबरला मतदान हाेणार आहे. योगींच्या दौऱ्यापूर्वी असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, भाजप सर्जिकल स्ट्राइक करेल तर १ डिसेंबरला मतदार डेमोक्रॅटिक स्ट्राइक करतील. त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले होते, ना योगींना घाबरणार ना चहावाल्याला. या भूमीवर जेवढा हक्क मोदींचा आहे, तेवढाच अकबरुद्दीनचाही आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.