आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबादची हायटेक सिटी. येथे आहे सर्वात मोठे इनोव्हेशन सेंटर ‘टी-हब’.आयकिया, डलास सेंटर, डेलॉय आदी प्रमुख कंपन्यांच्या कार्यालयांच्या मधोमध. टी-हबला नुकताच स्टार्टअप डेनिमित्त ‘बेस्ट इनक्युबेटर’ पुरस्कार मिळाला. येथे आल्यावर अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत आल्यासारखे वाटते. तथापि, रस्त्यावरील वाहतूक व गर्दीमुळे भ्रमनिरास होतो. टी-हबला जगातील सर्वात मोठे इनोव्हेशन सेंटर म्हणता येईल? उत्तरात सीईओ श्रीनिवास राव महानकाली तथा एमएसआर सांगतात, ‘कोणत्याही इनोव्हेशन सेंटरचे यश मोजण्याचे मापदंड येथून निघालेल्या यशस्वी स्टार्टअप व त्यांची फंडिंग हेच असू शकते. देशातील पहिली खासगी अंतराळ संस्था स्कायरूटची संकल्पना इथेच आकाराला आली. तंत्रज्ञान पाहण्या-ऐकण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अशा शेकडो स्टार्टअप्सवर येथे रोज काम होते.’ जाणून घेऊया येथे नवीन काय होत आहे...
१८०० पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सना तंत्रज्ञान ते फंडिंगपर्यंतची मदत
न्यूरल सिंक : प्रत्येक चित्रपट तुमच्या भाषेत
‘न्यूरल सिंक’द्वारे कोणत्याही भाषेतील चित्रपट आपल्या भाषेत पाहता येतो. आतापर्यंत केवळ डबिंगद्वारे असे व्हायचे, पण यात ओठांची हालचाल बदलत नव्हती. या तंत्रज्ञानाने ‘लिप सिंक’ही शक्य.
ग्रोपिटल : कृषीमध्ये हमीपात्र परतावा
येथे ‘ग्रोपिटल’ स्टार्टअप आकार घेत आहे. तो तुम्हाला क्रिप्टो वा शेअर्समध्ये गुंतवणुकीचे पर्याय देत नाही, तर कृषी क्षेत्रात हमीपात्र परताव्याबाबत सांगतो.
स्कायरूट : येथून निघाला चर्चित स्टार्टअप
इस्रोचे अभियंते पवन चंदाना व नागा भारत यांनी सुरू केलेली पहिली खासगी अंतराळ संस्था स्कायरूटचे काम येथेच झाले होते.
निधी : दोन हजार कोटी रुपये जमवले
नोव्हेंबर २०१५ मध्ये तेलंगण सरकार व रतन टाटा यांनी टी-हबचे उद्घाटन केले होते. २०२२ मध्ये दुसरा टप्पा
सुरू झाला. टी-हबचे मार्केटिंग लीड एस. शंकर कुंडू म्हणाले, ‘हबने आतापर्यंत १८०० पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सना तंत्रज्ञान, गुणवत्ता, मेंटर्स, ग्राहक व गुंतवणूकदार जमवण्यास मदत करण्यासह त्यांच्यासाठी २ हजार २६९ कोटी रुपयांचा निधीही जमा केला आहे.
इन्फ्रा : सर्वात मोठा इनोव्हेशन कॅम्पस
टी-हब ५,८२,६८९ चौरस फुटांत बनले आहे. येथे २ हजारांहून अधिक स्टार्टअप्स सोबत काम करू शकतात. युवा उद्योजकांसाठी येथे Y Hubही आहे.
युनिक : आयडिया द्या, स्टार्टअप मिळेल
टी हब ६M आणि २P च्या सिद्धांतावर काम करतो. ६M म्हणजे मेंटॉर, मार्केट, मोटिव्हेशन, मॅनपाॅवर, मनी व मॅथडोलॉजी. २P म्हणजे पार्टनरशिप आणि पॉलिसी अॅडव्हायझरी. एकूणच तुमच्याकडे केवळ आयडिया असली पाहिजे. टी-हब त्याचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.