आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Am Not Asking For Mercy ... I Will Accept The Punishment: Adv. Prashant Bhushan

नवी दिल्ली:मी दयेची मागणी करत नाही... जी शिक्षा होईल ती स्वीकारेन : अॅड. प्रशांत भूषण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वक्तव्यांचा फेरविचार करा : सुप्रीम कोर्ट; विचारपूर्वकच बाेललो, त्यात बदल नाही : भूषण

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी वकील प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावण्यावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी जोरदार वाद-प्रतिवाद झाले. न्यायालयाने पुनर्विचार याचिका दाखल करेपर्यंत निकाल टाळण्याची भूषण यांची मागणी फेटाळली. भूषण यांना लक्ष्मण रेषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेची आठवण करून देत न्यायालयाने म्हटले, एखादी व्यक्ती १०० चांगली कामे करत असेल तर तिला दहा चुका करण्याचा परवाना मिळतो असे नव्हे. दुसरीकडे, भूषण यांनी महात्मा गांधी यांचा हवाला देत, “मी दयेची मागणी करत नाही. न्यायालय जी शिक्षा देईल ती आनंदाने स्वीकारेन,’ असे नमूद केले. नंतर न्यायालयाने त्यांना आपल्या वक्तव्यावर पुनर्विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांची मुदत दिली. यावर भूषण म्हणाले, “मी हे वक्तव्य विचारपूर्वकच केले आहे. यात बदल करण्याची शक्यता नाही.’

न्या. मिश्रांची नाराजी, म्हणाले- माफी देणार नाही
न्या. मिश्रा यांनी भूषण यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत त्यांना माफी देणार नाही, असे नमूद केले. त्यानंतर भूषण यांना पुनर्विचारासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा का, हे महाधिवक्त्यांनी सांगावे, असे न्या. मिश्रा म्हणाले. त्यावर महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी त्यास संमती दर्शवली. अखेरीस न्यायालयाने प्रशांत भूषण यांना पुनर्विचारासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी देत सुनावणी तहकूब करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...