आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये एका घरात ओलीस ठेवलेल्या नागरिकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करताना राष्ट्रीय रायफल्सच्या २१ व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ वीर शहीद झाले. जयपूरमध्ये राहत असलेली आशुतोष यांनी पत्नी पल्लवी यांनी या हौतात्म्यावर अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘देशाचे रक्षण करताना माझे पती शहीद झाले त्याचा मला अभिमान आहे. मी अश्रू ढाळणार नाही. देशासाठी बलिदान हा सन्मान आहे. हा त्यांचा निर्णय होता. पेशा हीच त्यांची जिद्द होती. अशा सर्वोच्च बलिदानावर कुणी खेद व्यक्त करावा किंवा अश्रू ढाळावेत हे योग्य ठरणार नाही.’
शर्मा यांनी गेल्या वर्षी ग्रेनेड फेकणाऱ्या दहशतवाद्याचा झडप मारून खात्मा केला
काश्मीरमध्ये तैनात एका मेजर जनरलनी सांगितले, कर्नल शर्मांना जिवाची कधीच पर्वा नव्हती. त्यामुळेच २०१८ व २०१९ रोजी त्यांना लष्करी पदक मिळाले होते. समोरासमोर दहशतवाद्यांशी लढून त्यांचा खात्मा केल्याबद्दल दुसरे पदक मिळाले होते. तो दहशतवादी हातबॉम्बने हल्ला करणार एवढ्यात कर्नल शर्मा यांनी त्याला झडप मारून पकडले आणि तिथेच त्याचा खात्मा केला होता. गनिमी काव्यात कर्नल शर्मा माहीर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.