आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ जानेवारी ते १५ ऑगस्ट १९४७ दरम्यान स्वातंत्र्याचा मार्ग कसा होता... मालिकेतील सातवा भाग आज
जून १९४७च्या कडक उन्हात हिंदुस्थानचे उद्याचे भविष्य एका विचित्र अस्वस्थतेच्या जाणिवेने बेचैन होते. एक स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना भरल्या डोळ्यांनी आनंद साजरा करताना कदाचित यापूर्वी कधी कुणी पाहिले नसेल. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे दु:ख अशा क्षणांतील भावना हिंदुस्थानच्या शब्दांत सांगताहेत - डॉ. धनंजय चोप्रा (लेखक अलाहाबाद विद्यापीठाच्या सेंटर ऑफ मीडिया स्टडीजमध्ये अभ्यासक्रम समन्वयक आहेत.)
३ जून १९४७. भारताच्या फाळणीच्या घोषणेनंतर उगवलेला प्रत्येक दिवस सोबत वेदनेच्या लाखो कहाण्या घेऊन उलटत होता. माझ्या शरीरावर माझ्या मुलांच्या रक्ताने फाळणीच्या खुणा केल्या जात होत्या. माझा आक्रोश आतच गतप्राण होत होता. रस्ते, तलाव, शेत, नदी, घर, कार्यालय... दोन तुकडे झाले नाहीत, असे काहीच राहिले नाही. ८० टक्के भाग भारताला आणि २० टक्के भाग पाकिस्तानला द्यायचे ठरले. फाळणीच्या धर्तीवर अपेक्षा मृतांचे ढिगारे बनून विखुरल्या जात होत्या. बंगाल आणि पंजाबचे तुकडे होणार हे नक्की होते. त्यामुळे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित युद्ध पेटले. ४० कोटी लोकांचे घर-कुटुंब विभागणार होते. जूनच्या दुपारीच आपल्या मातीला अखेरच दंडवत घालून एका अज्ञात स्थळी जावे लागण्याची भीती सतावत होती. इकडे व्हाइसराॅय माउंटबॅटन यांचा एक संदेश दररोज सरकारी कार्यालयात चिकटवला जात होता. त्यात लाल चौकटीत मधोमध लिहिलेले असायचे -
१५ ऑगस्टला .... दिवस उरले. दिनांक १५ जून १९४७, माउंटबॅटन योजनेवर काँग्रेसची मोहोर उमटवण्यासाठी नेहरू अधिवेशनात पोहोचले तेव्हा त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. मौलाना आझाद म्हणाले- फाळणी खूप काळ टिकू शकणार नाही. चोइथराम गिडवानी यांनी तिला आत्मसमर्पण असे संबोधले. जगत नारायण, राम मनोहर लोहिया आणि पुरुषोत्तमदास टंडनसारखे नेतेही सहमत नव्हते. या निर्णायक क्षणी गांधी अचानक नेहरू आणि पटेल यांच्या पक्षात दाखल झाले. परिणामी प्रस्ताव १५७ मतांनी संमत झाला. विरोधात २९ मते गेली. ३२ तटस्थ राहिले. तिकडे जिनाही मुस्लिम लीगमध्ये प्रस्तावाच्या बाजूने बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान, सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या पठाणांच्या उत्तर-पश्चिम सीमा प्रांतातून
खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांनी म्हटले की, त्यांना पाक नव्हे, तर आपले वेगळे पश्तुनिस्तान हवे. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही. इकडे, १८ जूनला काश्मीरला पोहोचलेले माउंटबॅटन महाराजा हरी सिंह यांना म्हणाले, तुम्ही पाकिस्तानसोबत गेलात तर भारत सरकार त्याला मित्राशी दगाबाजी म्हणणार नाही. तिकडे सरदार पटेल यांनी इंग्रजांचा डाव ओळखला होता. काश्मीर भारताचाच भागा राहावा, यासाठी ते निकराचे प्रयत्न करत होते.
- उद्या वाचा : आपल्या तिरंग्याची जन्मकथा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.