आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक 2022:मी गुजरात घडवला : नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून ‘आरोपपत्र’ जाहीर

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पहिला रोड-शोे केला. त्यानंतर ते वलसाड येथे दाखल झाले. त्यांनी जाहीर सभेला मार्गदर्शन केले. यात त्यांनी नवीन घोषवाक्य दिले आहे. ‘मी गुजरात घडवलाय’ असा त्याचा आशय आहे. ते म्हणाले, आम्ही गुजरातच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. प्रत्येक गुजराती व्यक्ती आत्मविश्वासाने वावरतो. म्हणूनच ते गुजराती बोलतात. त्यांच्यामधून समूह स्वर ऐकायला मिळतो. ‘त्यांनी हा गुजरात घडवलाय’. सभेला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. काँग्रेसच्या गुजरात प्रदेश शाखेने निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारच्या विरोधात २२ सूत्री ‘आरोपपत्र’ जाहीर केले आहे. भाजप जनविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपच्या कार्यकाळात गुजरातमधील नागरिकांना भूक, भय व अत्याचारालाच तोंड द्यावे लागले आहे. आरोपपत्रात मोरबी पूल पडल्याच्या घटनेचाही प्रामुख्य्याने उल्लेख करण्यात आला आहे. त्यात १३५ जणांचा मृत्यू झाला होता. बिल्किस बानो प्रकरणात ११ दोषींची सुटका व गुजरात दंगली दरम्यान त्यांच्या परिवारातील सात सदस्यांची हत्या ‘घटनाबाह्य’ असल्याचे नमूद केले आहे.

आम्ही ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणली : शहा सिमला | हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांगडा येथे सभा घेतली. बगवाचे भाजप उमेदवार अरुण कुमार मेहरा यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शहा यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, काँग्रेसकडे काहीही मुद्दा नाही. मोदी सरकारने २०१५ मध्ये सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्ण केली. चंबा, नाहन, हमीरपूरमध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना केली. भाजप सरकारने राज्यात ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने २०१७ मध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, असा आरोप काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...