आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाची पाने:मी गांधीजींशी तासभर चर्चा केली, पण त्यांनी ऐकले नाही

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी ३ सप्टेंबर १९३९ राेजी मद्रासच्या समुद्रकिनारी दाेन लाखांहून जास्त लाेकांच्या जाहीर सभेला संबाेधित करत हाेताे. त्या दरम्यान गर्दीतून एक जण समाेर आला आणि त्याने माझ्या हाती सायंदैनिक ठेवले. पेपरचा मथळा हाेता- ‘दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने जर्मनीविराेधात युद्ध पुकारले.’ भारतासाठी स्वातंत्र्य मिळवण्याची ही सुवर्णसंधी हाेती. ६ डिसेंबरला व्हाइसरॉय लिनलिथगाे व महात्मा गांधी यांच्यात चर्चा झाली. बैठकीनंतर भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा तूर्त मांडला जाणार नाही, असे संयुक्त पत्रक काढण्यात आले. त्यामुळे भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले गेले. भारतीय सैनिकांना ब्रिटनच्या बाजूने लढण्यासाठी दूरच्या ठिकाणी तैनात करण्यात आले. गांधी व नेहरू यांच्या समर्थकांनी ब्रिटिश सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. मी जून १९४० मध्ये महात्मा गांधींसाेबत शेवटची चर्चा केली. ही चर्चा तासभर चालली. ते म्हणाले, जर्मनीचे सैन्य फ्रान्समध्ये घुसले आहे. ब्रिटिश सैन्याचे मनाेबल खचले आहे. आता ब्रिटिशांविराेधातील आंदाेलनाला धार द्यायला हवी, असे मी त्यांना सांगितले. परंतु गांधीजींनी काेणतेही आश्वासन दिले नाही. परंतु ते म्हणाले, माझ्या (सुभाषचंद्र बाेस) पद्धतीने स्वातंत्र्य मिळाल्यास ते (गांधीजी) टेलिग्रामवर शुभेच्छा संदेश देणारे पहिले व्यक्ती ठरतील. त्यादरम्यान पुढे ब्रिटिश सरकारने मला अटक केली. त्याआधी अकरा वेळा अटक झाली हाेती. तुरुंगात राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येणार नाही, असे मला वाटत हाेते. मी तुरुंगात अन्नत्याग केला. सात दिवसांनंतर माझी प्रकृती बिघडली. त्यानंतर माझी सुटका झाली. एक महिना घरी राहिल्यानंतर जानेवारी १९४१ राेजी एका रात्री मी ब्रिटिश हेरांना चकवा देऊन फरार झालाे. १४ जुलै १९४२ राेजी काँग्रेसने भारत छाेडाे आंदाेलन पुकारले...

स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख टप्पे १९२८ : सायमन कमिशनला देशभर विराेध.. ब्रिटिश सरकारने प्रशासकीय सुधारणांसाठी जाॅन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन पाठवले. सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.त्यावरून असंतोष होता.

सायमन गाे बॅक.. -काँग्रेससाेबतच मुस्लिम लीगनेदेखील सायमन कमिशनला विराेध केला. देशभरात ‘सायमन गाे बॅक’च्या घाेषणा देत निदर्शने करण्यात आली.

राय यांच्यावर लाठ्या -लाहाेरमधील निदर्शनांदरम्यान पाेलिस लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. अनेक तीव्र जखमांमुळे अखेर त्यांचे १७ नाेव्हेंबर १९२८ राेजी निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...