आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ काँग्रेसमध्ये थरूर गट निर्माण होण्याची प्रतिस्पर्ध्यांना भीती:थरुर म्हणाले - मी कोणाला घाबरत नाही, कुणी मला घाबरण्याची गरज नाही

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी एक मोठे वक्तव्य केले आहे. माझ्या केरळ दौऱ्याची काही जणांना भीती वाटत होती. पण मी कोणाला घाबरत नाही आणि कुणी मला घाबरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसेच केरळ काँग्रेसमध्ये कोणताही गटबाजी करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. थरूर यांनी केरळमध्ये UDF सहयोगी IUML च्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

केरळमधील काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत थरूर गटाचा उदय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळमध्ये 2016 ला काँग्रेसच्या हातातून सत्ता गेली होती. अशा स्थितीत पक्षांतर्गत नवीन गटबाजीची चर्चा सुरू झाली होती. यामुळे थरुर यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.

भाजपवर साधला निशाणा

थरूर पुढे म्हणाले की, देशात फुटीरतावादी राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र आणणाऱ्या राजकारणाची गरज आहे. IUML ने अलीकडेच चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबई येथे बंधुभाव वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे कौतुकास्पद आहे. तर थरूर यांची भेट घेतल्यानंतर सादिक अली शिहाब थंगल म्हणाले की, म्हणाले की, थरूर यांचे त्यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. थरूर यांना सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांना आमंत्रित केले जाते. म्हणून, या भागात असल्याने ते आम्हाला भेटायला आले. थरूर यांनी केरळच्या राजकारणात सक्रिय राहावे अशी त्यांची इच्छा आहे का, असे विचारले असता थंगल म्हणाले की, ते आधीच सक्रिय आहेत. ते केरळचे खासदार आहेत.

पुढे थरुर म्हणाले की, कोणताही गटबाजी करण्याचा इरादा नाही आणि त्यात रसही नाही. काँग्रेसमध्ये आधीच गट आहेत, आता त्यात आणखी दुफळी घालायची नाही. अशा परिस्थितीत जर काही घडायचे असेल तर ते U म्हणजे संयुक्त काँग्रेस असेल. काँग्रेससह आपल्या सर्वांना त्याची नितांत गरज आहे.

दुफळी पडत असलेल्या काँग्रेसमध्ये आणखी गटबाजी करण्याचा इरादा नाही - थरुर
दुफळी पडत असलेल्या काँग्रेसमध्ये आणखी गटबाजी करण्याचा इरादा नाही - थरुर

केरळ काँग्रेस वादात

दुसरीकडे काँग्रेसमध्ये शशी थरूर यांना साईडलाईन करण्याचा प्लॅन आहे असे बोलले जात आहे. केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शशी थरूर यांचे सत्र थांबवण्यात आले होते. यामागे काँग्रेसमधील ज्यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांचा हात असल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते के मुरलीधरन यांनी केला होता. थरूर यांना बोलण्यापासून रोखण्याच्या कारस्थानाची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी कोझिकोडचे काँग्रेस खासदार एमके राघवन यांनी केली आहे. विशेष म्हणजे राघवन यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरूर यांना पाठिंबा दिला होता.

सुकाणू समितीमधून वगळले

काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीची स्थापना होईपर्यंत पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी खरगेंनी सुकाणू समिती स्थापन केली. पण, यात ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शशी थरुर यांना वगळण्यात आले आहे. काँग्रेसमधील बुद्धिजीवी आणि हुशार नेत्यांपैकी आघाडीचे नाव असलेल्या थरूर यांचं नाव सुकाणू समितीत नसणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. तिरुवनंतपुरमचे लोकसभा खासदार असलेले थरुर काँग्रेसच्या जी-२३ गटाचे सदस्य आहेत. या गटातील सदस्यांनी पक्षाचा काही भूमिकांवर टीका करत बदलांची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...