आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Never Asked For A Post: Pilot, To Win The Hearts Of The Disgruntled: CM Gehlot

राजकीय नाट्याचा 33 दिवसांनंतर शेवट:मी कधी पद मागितले नाही : पायलट, नाराजांची मने जिंकू : सीएम गहलोत

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाल्याने राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक आमदार दिल्लीहून जयपूरला परतले आणि आपल्या घरी पोहोचले. त्यांनी पत्रकारांना सांगितले, सुडाचे राजकारण व्हायला नको. मी कोणतेही पद मागितलेले नाही. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास मी तयार आहे. देशद्रोहप्रकरणी मला एक नोटीस आली होती. त्यावरील हरकत व काही वर्षांपासूनच्या घटनाक्रमाबाबत दिल्लीला गेलो होतो. यानंतर अनेक घटना घडल्या ज्या सकारात्मक नव्हत्या. आमचे कोणतेही वागणे पक्षाविरोधात नव्हते.

पायलट यांच्या घरवापसीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले, माझे आमदार जर माझ्यावर नाराज असतील तर मी त्यांचे मन जिंकायला हवे, ही माझी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. त्यांना काय आश्वासन दिले होते आणि ते का तक्रार करत आहेत, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन.

बातम्या आणखी आहेत...