आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Successful In Life | Motivational Speakers And Books | Success Tips For Life | Career Funda

करिअर फंडा:मी सांगतोय तुम्ही यशस्वी व्हाल, फक्त मोटिव्हेशनल स्पीकर आणि पुस्तकांच्या चक्रव्यूहापासून दूर रहा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअर फंडामध्ये आपले स्वागत आहे!

मोटिव्हेशनल स्पीकर्सचे ज्ञान

मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे. ज्यांना शालेय जीवनात दोन-तीन प्रेरणादायी पुस्तके वाचल्यानंतर लक्षात आले होते की सर्व लोक मुळात एकाच गोष्टीबद्दल बोलतात. कठोर परिश्रम करा, तुमचा प्रत्येक सेकंद वाया घालवू नका, जास्त झोपू नका, सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवा आणि सकाळी लवकर उठा!

मुळात अतिशय सोप्या गोष्टी ज्या सहसा प्रत्येकाला माहीत असतात.

माझ्या बाबांनी मला काय शिकवले

माझ्या दिवंगत वडिलांकडून एकच धडा होता की "बेटा, तुझ्या मेंदूचा जास्त वापर करू नकोस. आजचे काम मनापासून सुंदर कर, आजचा दिवस मनापासून जग, जाणूनबुजून तुझ्या कृतीने कोणाचेही नुकसान करू नकोस, उद्या आपोआप ठीक होईल.

असुरक्षिततेचा फायदा

एकदा व्यक्ती सकाळी उठला की तो काहीतरी करत असतो. याचा अर्थ तो व्यस्त असतो. कठोर परिश्रम करतो… पण यावेळी प्रश्न पडतो की त्याची मेहनत किती फलदायी आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे.

काही कारणास्तव जर असे नसेल तर तो एक डिसऑर्डर आहे. झोपेचा विकार, खाण्यापिण्याची विकृती, काही प्रकारचे व्यसन, नैराश्य आणि त्यावर योग्य उपचार आवश्यक आहेत. केवळ प्रेरणादायी पुस्तके वाचून आणि स्पीकरकडे जाऊन काहीही होणार नाही. पण किती पुस्तकं आणि वक्ते हे सत्य सांगतात?

खरं तर, बहुतेक स्पीकर, व्हिडिओ आणि पुस्तके मुळात तुमच्या भविष्याबद्दल तुमच्या असुरक्षिततेचा फायदा घेतात. तुम्ही जितके अयशस्वी आणि दु:खी आहात, तितकेच या पुस्तकांचे आणि स्पीकर्सचे चांगले ग्राहक बनता.

तुमच्या भावनांशी खेळले जाते - तीन टप्प्यांत

बहुतेक प्रेरक पुस्तके आणि लेखक तुमच्या भावनांशी कसे खेळतात ते आपण पाहूया...

1) साध्या समस्यांची अतिशयोक्ती केली जाते

मोटिव्हेशनल स्पीकर आणि पुस्तकांमध्ये कोणत्या प्रकारची शीर्षके आणि पंचलाइन ही तुम्ही जीवनाबद्दल निराश आहात का?, तुम्ही जीवनाबद्दल नाखूश आहात का?, तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही अयशस्वी आहात का?, तुम्हाला अधिक पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला मोठे घर हवे आहे का? तुम्हाला मोठ्या गाडीने प्रवास करायचा आहे का? ही असतात.

विचार करण्याची बाब आहे की, कार किंवा घर घेणे ही खरोखरच आयुष्यातली एवढी मोठी समस्या आहे का? किंवा तुम्हाला आनंद कोणाकडून मिळेल हे कोण सांगू शकेल?

माझ्यासाठी, हिवाळ्याच्या दुपारच्या वेळी बागेत पुस्तक वाचणे" किंवा "छान संध्याकाळी मित्रांसोबत सायकल चालवणे" हे मला सर्वात आनंदी वाटते. याचा अर्थ असा आहे की यापैकी बहुतेक समस्यांचे निराकरण तुमच्यातच दडलेले आहे. ज्यावर एकांतात बसून, विचार करून आणि प्रियजनांशी (आई, वडील, भाऊ, बहीण, बालपणीचे मित्र जे तुम्हाला खरोखर समजून घेतात) चर्चा केली जाऊ शकते.

२) नंतर याच समस्यांचे उपाय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातात.

मोटिव्हेशनल स्पीकर आणि पुस्तकांचे उपाय काहीसे असे आहेत. मी खूप गरीब जन्माला आलो, मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला, मग अशा प्रकारे पैसे कमवून मी आज श्रीमंत झालो. तुम्हीही तुम्ही हे करू शकता. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. फक्त खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्या कार्यक्रमात किंवा कोर्समध्ये सहभागी व्हा, इतके लोक माझ्या सेशनला उपस्थित राहून यशस्वी झाले आहेत, इत्यादी.

हे लोक असे बोलतात की जणू ते समस्या सोडवण्यासाठी पाठवलेले देवाचे दूत आहेत आणि आपले प्रश्न क्षणार्धात सुटतील.

किंबहुना दोष त्या वक्त्यांचा आणि पुस्तकाच्या लेखकांचाही नाही. तर त्यांच्या मोहात अडकलेल्या लोकांचा आहे. कोणीही एक कोर्स करून कोणत्याही क्षेत्रात मास्टर होत नाही. वर्षानुवर्षे एकच काम केल्याने नैपुण्य येते. ती तपश्चर्या आहे. जी तुम्ही तुमच्या क्षेत्रात वर्षानुवर्षे करता.

3) 'आशा' विकली जाते

किंबहुना हा 'आशा' विकण्याचा व्यवसाय आहे. जीवनात अडचणीत आणि दुःखी लोकांना तेच खोटे हजार वेळा ओरडून सांगितले जाते की ते खरे आहे असे वाटते. हे वक्ते आणि पुस्तके सर्वात वाईट गोष्ट करतात की ते केवळ भौतिक यशाबद्दल बोलतात. कोणीही तुम्हाला अधिक अभ्यास, संशोधन, शोध घेण्यास सांगत नाही. गोष्टींवर नवीन आणि चांगले उपाय देखील शिकवू शकत नाही. वेगळा विचार करण्यास, जीवनात नवीन दृष्टीकोन आणणे, खरे अध्यात्म (संघटित धर्म नाही), जीवनाचा खरा अर्थ इ. शिकवत नाहीत. कारण, यापैकी बहुतेक गोष्टी या स्व:ता व्यक्तीला कराव्या लागतात.

यापासून स्व:ताला वाचवावं

माणसाचं आयुष्य फक्त मोठं घर आणि मोठ्ठी गाडी या स्वप्नापुरतं मर्यादित असतं का?

नेल्सन मंडेला, सुभाष बोस, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन यांसारख्या महान लोकांचे जीवन बघा, ही स्वप्ने घेऊन त्यांनी आयुष्य जगले का?

निरुपयोगी युक्तींना बळी पडू नका. कारण बहुतेक वक्ते आणि पुस्तकांचे लेखक तुम्हाला जे सांगतात, तसे ते स्व:ताही करत नाहीत.

त्याऐवजी, प्रत्यक्षात तुमचे ज्ञान वाढवण्याचे काम करा

(1) साहित्य, विज्ञान, अर्थशास्त्र, भूगोल, राजकारण इत्यादी विविध विषयांवरील पुस्तके वाचा.
(2) तुमची उत्सुकता कायम ठेवा.
(3) चित्रपट, माहितीपट, वेबसिरीज, ऑडिओ बुक्स ऐका.
(4) वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्या, लोकांना भेटा आणि ते कसे करत आहेत ते पहा

हे तुमचे जीवन 'श्रीमंत' बनवेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा की पैसे मिळवणे हा त्यातील एक छोटासा भाग आहे.

त्यामुळे आजचा करिअरचा फंडा हा आहे की, मंत्रमुग्ध होऊ नका आणि मोटिव्हेशनल स्पीकर्सच्या मागे धावू नका, त्यांचे गुलाम बनू नका, तर तुमची क्षमता वाढवा आणि स्वतःची यशोगाथा लिहा.
करुन दाखवा!

बातम्या आणखी आहेत...