आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Was Shocked; But The Pressure Of The Employees For Compromise, The Behavior Of The Employees Presented By The Old Woman

लघुशंका प्रकरण:मला धक्का बसला होता; परंतु कर्मचाऱ्यांचा तडजोडीसाठी दबाव, वृद्धेने मांडली कर्मचाऱ्यांची वागणूक

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करताना ७० वर्षीय महिलेसमोर गैरवर्तन करणाऱ्या घटनेचा एफआयआर समोर आला आहे. एअर इंडियाकडील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यात या महिलेने दिलेली हकीगत अशी- ‘२६ नोव्हेंबर रोजी लंचनंतर फ्लाइटमधील दिवे बंद केले गेले. तेव्हा ८ ए आसनावरील पुरुष त्यांच्या ९ ए आसनाजवळ आला. तो मद्यधुंद होता. येताच माझ्यावर लघुशंका करू लागला. माझे कपडे, बूट, बॅगही भिजली. बॅगेत पासपोर्ट, तिकीट आणि पैसे होते. त्याबद्दल कळवले तेव्हा फ्लाइट स्टाफने त्याला स्पर्श करण्यास मनाई केली. बूट व बॅगेवर डिसइन्फेक्टेड शिंपडण्यात आले. ते मला बाथरूममध्ये घेऊन गेले. तेथे त्यांनी मला एअरलाइनचा पायजमा व सॉक्स दिले. त्यावर मी दुसरे आसन द्यावे अशी मागणी केली. पण खाली नसल्याचे सांगण्यात आले. मी २० मिनिटे उभी राहिल्यानंतर स्टाफने लहान क्रू सीट दिली. तेथे मी दोन तास बसले. त्यानंतर मला जुन्या आसनावर जाण्यास सांगण्यात आले. तेव्हाही आसन ओलेच होते. तेथे लघुशंकेचा वास येत होता. म्हणून बसण्यास नकार दिला. त्यानंतर राहिलेल्या प्रवासासाठी एअर होस्टेसचे आसन देण्यात आले.’

महिलेच्या म्हणण्यानुसार फ्लाइट दिल्लीला पोहोचताच आरोपीला अटक करण्याची मागणी केली. मला आरोपीशी काहीही बोलण्याची इच्छा नाही किंवा त्याला पाहण्याची देखील इच्छा नाही. परंतु विमान कर्मचारी त्याच्याशी चर्चा करावी या मुद्यावर अडून होता. त्यांनी क्रू सीटवर आरोपीला समोरासमोर बसवले. तो रडत होता. माझी माफीही मागत होता. तक्रार दाखल करू नये, अशी विनवणी करत होता. ही गोष्ट पत्नी आणि मुलांना कळू नये, असे त्याला वाटत होते. खरे तर मला धक्का बसलेला होता. परंतु कर्मचारी तडजोडीसाठी अडून होते.

विमान कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिकता मुळीच नाही. अशा संवेदनशील व धक्कादायक घटनेत त्यांनी कसलाही पुढाकार घेतला नाही, असा या महिलेचा आरोप आहे. माझ्या जावयाने २७ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाकडे तक्रार दाखल केली होती, असा दावाही महिलेने केला आहे. एअरलाइन कंपनीने तिकिटाचे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु प्रत्यक्षात आंशिक पैसे दिले. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे.

दुसऱ्या घटनेचाही अहवाल : हवाई प्रवासासंबंधी नियामक डीजीसीएने ६ डिसेंबरला पॅरिस-नवी दिल्ली फ्लाइटमधील दुसऱ्या घटनेचा एअर इंडियाकडून अहवाल मागवला. डीजीसीए म्हणाले, पुरुषाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. पण माहिती दिली नव्हती.

आरोपी वेल्स फॉर्गो कंपनीचा उपाध्यक्ष, कंपनीने काढले
आरोपीची ओळख मुंबईतील शंकर मिश्रा अशी आहे. वेल्स फॉर्गो कंपनीचा तो उपाध्यक्ष आहे. अमेरिकेतील मल्टिनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने शंकरला नोकरीवरून काढले. पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर काढले आहे. महिलेने माफ केले होते. तक्रार करणार नसल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...