आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'I Will Not Support The One Whose Father Is Powerful', 27% Muslims Imprisoned In UP, Who Will Talk About Him? Asaduddin Owaisi

ओवेसींचे आर्यनला समर्थन देण्यास नकार:'ज्याचे वडील पावरफुल आहे त्याला माझा समर्थन नाही', 27% मुस्लिम युपीच्या तुरुगांत कैद, त्यांच्याबद्दल कोण बोलणार?- असदुद्दीन ओवेसी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे जेल आहे. आर्यनला सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळेलेले नाहीत. मात्र तरी देखील आर्यनला अद्याप जामीन मिळाला नाही. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शक्तिशाली लोकांसाठी मी लढणार नाही' असे मत ओवेसींनी व्यक्त केले आहे.

आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद असून, 02 ऑक्टोंबरला NCB रेवपार्टीमध्ये छापा टाकत मोठा भांडाफोड केला होता. त्यामध्ये आर्यन सहा आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय नेते आणि नेटकरी आर्यनवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे.

गाझियाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करतांना ओवेसींनी आर्यन खान बद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'तुम्ही मला एका सुपरस्टारच्या मुलाबद्दल विचारत आहे. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. तो एक पावरफुल बापाचा मुलगा आहे. युपीतील तुरुगांमध्ये 27% मुसलमान कैद करण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल कोणी बोलेल का? मी गरिब, कमकुवत लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. ज्याचे वडील पावरफुल आहे त्यांच्यासाठी मी कधीच लढणार नाही' असे मत ओवेसींनी व्यक्त केले.

बाहेर आल्यानंतर चांगली व्यक्ती होणार - आर्यन
आर्यनला अद्याप जामीनाची प्रतिक्षा आहे. एनसीबीने त्याला 02 ऑक्टोंबरला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याने एनसीबीचे जनरल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सांगितले आहे की, 'मी एक चांगली व्यक्ती होणार असून, चांगले कामे मी करणार आहे. एक दिवस तुम्हाला देखील माझ्यावर गर्व होईल.' असे मत आर्यनने व्यक्त केले आहे.

शाहरूख- गौरीने पाठवले आर्यनला मनी ऑर्डर
11 ऑक्टोंबरला शाहरुख आणि गौरीने आपला मुलगा आर्यनसाठी 4500 रुपयांचा मनी ऑर्डर जेलमध्ये पाठवला होता. तुरुगांत असतांना जास्तीत जास्त 4500 रुपये इतकेच सोबत ठेवण्याची मुभा आहे. त्या पैशातून आर्यनने जेल कॅन्टींगमधून जेवण, पाणी घेतले आहे. कारण सर्वसामान्य कैद्यांना दिले जाणारे जेवण आर्यनला आवडत नाही.

कैदी नंबर 956 आर्यन
आर्यन सोबत अरबाज मर्चेंट, मुनमुन धमीचा सह अन्य आरोपी 20 ऑक्टोंबरपर्यंत तुरुंगात आहे. न्यायालयात पुढील सुनावणी 20 तारखेला होणार आहे. तोपर्यंत आर्यनला तुरुंगातमध्येच थांबावे लागणार आहे. प्रत्येक कैदी प्रमाणे आर्यनला देखील एक बॅच नंबर देण्यात आले आहे. त्याचे नंबर 956 आहे.

बातम्या आणखी आहेत...