आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचे उच्चपदस्थ सनदी अधिकारी संजय पोपळी यांचा 26 वर्षीय मुलगा कार्तिक पोपळी याचा सेक्टर-11 येथील घरात गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. पोपळी यांच्या चंदिगड स्थित घरात दक्षता (व्हिजिलेंस) अधिकाऱ्यांची छापेमारी सुरू असताना ही घटना घडली. कुटुंबियांनी कार्तिकला गोळी घालण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर चंदिगडचे एसएसपी कुलदिप चहल यांनी कार्तिकने स्वतःच्या पिस्तुलाने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
व्हिजिलेंसने 4 दिवसांपूर्वी संजय पोपळी यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक केली होती. पोपळींना आजच मोहाली कोर्टात सादर केले जाणार आहे. कुटुंबाने त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. व्हिजिलेंसचे अधिकारी त्यांच्यावर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकत होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने हे पाऊल उचलले, असे ते म्हणाले.
व्हिजिलेंसचे पथक व कार्तिकमध्ये वाद
कुटुंबाच्या माहितीनुसार, व्हिजिलेंसच्या पथक त्यांच्या घरी आले होते. त्यांनी घराची झडती घेतली. ते काहीतरी जप्त करण्यासाठी आले होते. यावेळी कार्तिक व अधिकाऱ्यांत वाद झाला. त्यानंतर कार्तिकने स्वतःला गोळी घातली. कार्तिकच्या आईने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरही गंभीर आरोप केले.
पोपळीच्या घरात आढळली होती काडतुसे
संजय पोपलीच्या अटकेनंतर व्हिजिलेंसच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चंदिगड सेक्टर 11 स्थित घराची झडती घेतली होती. तिथे 73 काडतुसे जप्त करण्यात आली. यात 41, .32 बोरचे 2 व .22 बोरच्या 30 काडतुसांचा समावेश आहे. यामुळे पोपलींवर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कमीशन घेतल्याप्रकरणी झाली अटक
IAS अधिकारी संजय पोपली पंजाब सरकारमध्ये पेंशन संचालकपदी नियुक्त होते. काही दिवसांपूर्वी व्हिजिलेंस ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर सीव्हरेज बोर्डाच्या सीईओपदी असताना 7.3 कोटींच्या प्रकल्पात 1 टक्के कमीशन मागितल्याचा आरोप आहे. याचा 3.50 लाख रुपयांचा पहिला हप्ता त्यांना देण्यात आला होता. दुसऱ्या हप्त्यासाठी ते दबाव टाकत असताना हरियाणाच्या कर्नाळच्या ठेकेदाराने पंजाब सीएमच्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइनवर तक्रार केली. त्यानंतर पोपलींना बेड्या ठोकण्यात आल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.