आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायश ही नशिबाने नाही. तर मेहनतीने मिळतं. एर्नाकुलम स्टेशनवर हमाल म्हणून काम करणार्या या तरुणाने घरच्या जबाबदाऱ्यां पार पाडत अभ्यास केला आणि UPSC परीक्षेत यश मिळवले. रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने आयएएस अधिकारी बनून जगासमोर यशाचे नवे उदाहरण ठेवले आहे. अनेक जण अपयशाचं कारण देताना तक्रारींचा पाढा वाचत असतात. मात्र, याबाबत श्रीनाथची कधीच तक्रार नव्हती. संकटाचे संधीत रूपांतर करून त्याने यश गाठले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. त्यासाठी मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये खर्च करतात. मूळचा केरळचा असलेल्या श्रीनाथने रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत असताना कोणत्याही कोचिंगची मदत न घेता यूपीएससीमध्ये यश मिळवले. पण त्याआधी त्यांनी केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही आपल्या नावाचा झेंडा फडकवला आहे.
रेल्वेच्या मोफत वायफायचा योग्य वापर
श्रीनाथला कोचिंग सेंटरची फी परवडत नव्हती. यामुळेच त्याने केपीएससीची तयारी सुरू केली. रेल्वे स्थानकावरील मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. या वाय-फायच्या सहाय्याने त्याने आपल्या स्मार्ट फोनवर अभ्यास सुरू केला. हे मोफत वायफाय त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नव्हते. तो इथे हमाल म्हणून काम करायचा आणि वेळ मिळताच ऑनलाइन लेक्चर्स ऐकायचा. आपल्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर श्रीनाथने KPSC मध्ये यश संपादन केले. फ्री वाय-फायच्या मदतीने आपण UPSC परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकतो हा विश्वास इथूनच त्याला मिळाला.
तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी कौतुक केले
तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हमाल श्रीनाथचे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केले होते. गोयल यांनी लिहिले, केरळमध्ये पोर्टर म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. रेल्वेच्या मोफत वायफायसह, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या वायफायचा वापर करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवले, मी त्याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?
कोरोनानंतर एकटेपणा वाढला आहे. त्यातूनच चिंता, नैराश्याची सुरुवात होते. स्वतःचा नकारात्मक फोकस तयार होतो. आपण लोकांना टाळायला लागतो. एकटे पडतो. मात्र, हे सारे कसे टाळता येईल, हे जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांच्याकडून जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.