आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाते टिकवण्यात टॉपर अपयशी:IAS कपल टीना डाबी आणि अतहर खान यांनी कोर्टात घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2015 मध्ये UPSC टॉप करणाऱ्या IAS अधिकारी टीना डाबी आणि त्यांचे IAS पती अतहर खान यांनी जयपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते. अतहर मुळचे काश्मीरचे आहेत, तर टीना यांचे कुटुंब जयपूरचे आहे.

टीना जेव्हा UPSC टॉपर बनल्या होत्या, त्याच वर्षी अतहर सेकंड पोझिशनवर आले होते. ट्रेनिंगदरम्यान, टीना आणि अतहर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत आणि सध्या दोघांची जयपूरमध्ये पोस्टिंग आहे.

टीना यांनी नावातून खान हटवले

टीना यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्समधून खान आडनाव हटवले होते. यानंतर अतहर यांनीही टीना यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. यानंतर दोघे विभक्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 2018 मध्ये यांचे लग्न खूप लोकप्रिय झाले होते, जेव्हा अनेक नेत्यांना या आयएएस कपलला शुभेच्छा दिल्या होत्या. तर, हिंदू महासभेना या लग्नाला लव जिहाद म्हटले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser