आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस:आयसीआयसीआय लाेम्बार्ड भारती अॅक्सा खरेदी करणार, कराराच्या वाटाघाटी आघाडीवर,मूल्याबाबतही उभय पक्षांतील चर्चेत भर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराराच्या वाटाघाटी आघाडीवर,मूल्याबाबतही उभय पक्षांतील चर्चेत भर

खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बिगर आयुर्विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स खरेदी करू शकते. दोन्ही पक्षांतील चर्चा बरीच पुढे सरकली आहे. घटनाक्रमाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अधिग्रहणानंतर दोन्ही कंपन्यांची विमा संपत्ती विलीन केली जाईल. सध्या दोन्ही कंपन्यांमध्ये भारती अॅक्साच्या मूल्याबाबत चर्चा सुरू आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्डचा बाजारातील वाटा ८.४% आहे. या कंपनीच्या ५१.८९% हिस्सेदारीवर आयसीआयसीआय बँकेची मालकी आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीचे एकत्रित हप्ता संकलन ३,३०२.१९ कोटी रु. आहे. याच्या मागील वर्षांत या तिमाहीच्या तुलनेत ५.३% कमी आहे. मात्र, हे पूर्ण उद्योगात दिसलेल्या कमकुवतपणाशी अनुरूप आहे. भारती अॅक्सा जनरलचे एकत्रित हप्ता संकलन जून तिमाहीमध्ये वार्षिक आधारावर १२% घटवून ५०८.९३ कोटी रु. राहिले. या कंपनीची ५१% हिस्सेदारी भारती एंटरप्रायझेसकडे व ४९% हिस्सेदारी फ्रान्सची जॉइंट व्हेंचर पार्टनर अॅक्साकडे आहे.भारती एंटरप्रायझेस वित्तीय सेवा व्यवसायातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे.

आव्हानांचा सामना करतोय सामान्य विमा उद्योग
ही घटना अशा वेळी समोर आली जेव्हा सामान्य विमा उद्योग कोरोना महामारी आणि आर्थिक मरगळीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात आरोग्य विमा कंपन्या वगळता २५ जनरल इन्शुरन्स कंपन्या अाहेत. जून तिमाहीत त्यांच्या हप्त्याच्या संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६% ची घसरण आली. बिगर आयुर्विमा पॉलिसी विक्रीत घसरण आल्याने हे झाले.

बातम्या आणखी आहेत...