आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • ICMR Approves Saline Gargle RT PCR Method । COVID 19 Test । Covid 19 India। Coronavirus Symptoms

कोरोना चाचणीची नवीन पद्धत:सलाइन गार्गल RT-PCR चाचणीला ICMR कडून मंजुरी; स्वतःला घेता येणार सँपल, 3 तासात मिळेल रिुपोर्ट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या पद्धतीमुळे देशभरातील कोरोना चाचण्या वाढवण्यात यश मिळेल

कोरोनासंबंधित संशोधनात भारताला मोठे यश मिळाले आहे. नागपूरच्या नॅशनल इनवायरमेंट इंजीनियरिंग रिसर्च इंस्टीट्यूट (NEERI) ने कोरोना चाचणीची सोपी पद्धत शोधली आहे. या चाचणीद्वारे 3 तासात RT-PCR प्रमाणे अचूक परिणाम मिळतील.

या चाचणीला सलाइन गार्गल RT-PCR टेस्ट नाव दिले आहे. याचा अर्थ, ''मिठाच्या पाण्याने गुळण्या करुन चाचणी करणे.'' इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने शनिवारी याला मंजुरी दिली आहे. NEERI ने म्हटले की, या पद्धतीमुळे देशभरातील कोरोना चाचण्या वाढवण्यात यश मिळेल.

NEERI च्या वायरोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. कृष्णा खैरनार म्हणाले की, ही प्रोसेस एकदम सोपी, वेगवान आणि रुग्णासाठी आरामदायक आहे. ग्रामीण भागांसाटी ही खूप फायद्याची ठरेल.

सध्या RT-PCR चाचणीसाठी स्वाबचे नमूने देण्यासाठी दोन तास रांगेत थांबावे लागते. यानंतर स्वाब देऊन रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागतो. पण, सलाइन गार्गल RT-PCR टेस्टमध्ये लवकर सँपल देऊन तीन तासात रिपोर्ट मिळवता येते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ही रिसर्च गेम चेंजर ठरणार आहे. नागपूर महापालिकेने या चाचणीच्या पद्धतीला मंजुरी दिली आहे.

रुग्णाला कशाप्रकारे घेता येणार सँफल ?

 • या चाचणीसाठी एका नॉर्मल टेस्टिंग ट्युबची गरज आहे.
 • रुग्णाला सलाइन पाणी 15 सेकंद तोंडात ठेवल्यानंतर त्या ट्युबमध्ये टाकावे लागेल.
 • या सँपलला सामान्य तापमानात NEERI कडून तयार केलेल्या विशेष लिक्वीडमध्ये टाकले जाईल.
 • या लिक्वीडला गरम केल्यावर RNA टेम्प्लेट तयार होईल.
 • याला RT-PCR साठी प्रोसेस केले जाईल.
 • RNA च्या एक्सट्रेक्शनची दुसऱ्या पद्धतीच्या तुलनेत ही खूप स्वस्त आहे.
 • या पद्धतीतून जास्त वेस्टेज निघत नाही.
बातम्या आणखी आहेत...