आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती वाढली असताना लसीचा बूस्टर डोस घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. परंतु, हा बूस्टर डोस नेमका कधी घ्यावा याची अद्याप कल्पना लोकांना नव्हती. याच प्रश्नाचे उत्तर आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल (ICMR) चे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली. कोरोनासंदर्भात झालेल्या एका महत्वाच्या बैठकीनंतर त्यांनी संसदीय समितीला सल्ला दिला आहे.
आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी संसदीय समितीला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या 9 महिन्यानंतर बूस्टर डोस देण्यात यावा. अर्थातच लोकांच्या शंभर टक्के व्हॅक्सिनेशनशिवाय बूस्टर डोस देता येणार नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना व्हॅक्सीनसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी 2.30 वाजता कॅबिनेट सचिवांची बैठक होणार आहे.
आयसीएमआरच्या संशोधकांनी नुकतेच रिसर्च करून कोव्हिशील्ड कोविड-19 ला व्हॅक्सीनचे बूस्टर डोस म्हणून वापरण्याचा सल्ला दिला आहे. डेल्टा डेरिव्हेटिव्हच्या विरोधात या व्हॅक्सीनचा प्रभाव लक्षात घेता हा सल्ला देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोव्हिशील्डचे व्हॅक्सीन कोरोनाच्या अनेक प्रकरणांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह कमी करणे आणि जीवघेणी लक्षणे दूर करण्यास प्रभावी ठरले आहे. अशात या व्हॅक्सीनचा बूस्टर डोस दिल्यास कोरोनाविरुद्ध इम्युन सिस्टिम साधण्यात मदत होईल."
माध्यमांना ICMR कडून आवाहन
तत्पूर्वी आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी माध्यमांना आवाहन केले. "कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन संदर्भात लोकांमध्ये भीती पसरणार नाही यात मदत करावे अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली आहे. ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव आलेला नाही. कोरोनाच्या उपचारातही कुठलाही बदल झालेला नाही. यासंदर्भात अधिकाधिक बैठका घेऊन शास्त्रीय पुराव्यांचा शोध घेतला जात आहे." असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
केंद्र आणि राज्य सरकारकडूनही 100% लसीकरणावर भर
केंद्र सरकारला कोरोना लसीचे बूस्टर डोस देण्यापूर्वी दोन एक्सपर्ट समूहांनी आधी शंभर टक्के लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, बूस्टर डोस देण्यापूर्वी नागरिकांच्या लसीकरणावर भर आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तज्ज्ञांसोबत बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, राज्य सरकार आधी सर्व नागरिकांना कोरोनाच्या दोन्ही लस देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे असे अजित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.