आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • ICMR Coronavirus Testing Guidelines News And Updates; Indian Council Of Medical Research On Antigen Tests (Standard Q COVID 19 Ag Kit)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन गाइडलाइन्स:ICMR ने म्हटले- आता ऑफिस कर्मचाऱ्यांनाही कारावा लागेल अँटीजन टेस्ट; कोरियन किटने 30 मिनीटात मिळेल रिपोर्ट

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आयसीएमआरने 450 रुपयांच्या अँटीजन टेस्ट किटने ऑन द स्पॉट टेस्ट करण्यासा सल्ला दिला
 • कोरोना संशियाताचा अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यावर आरटी-पीसीआर टेस्ट केला जाईल
 • सर्व कंटेनमेंट झोनमधील सरकारी-खासगी हॉस्पिटल आणि प्रायवेट लॅबला ही चाचणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने मंगळवारी कोरोना चाचण्यांचा परीघ वाढवला आहे. आयसीएमआरने सर्व राज्यांना अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच सर्व हॉस्पिटल्स, ऑफिस आणि पब्लिक सेक्टर यूनिट्सला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा सल्लाही दिला आहे.

आयसीएमआरने आपल्या गाइडलाइन्समध्ये प्रत्येक कंटेनमेंट झोनमधील सरकारी-खासगी हॉस्पिटल आणि प्रायवेट लॅब्सला ही चाचणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. आयसीएमआरनुसार, अँटीजन टेस्ट किटद्वारे ऑन द स्पॉट चाचणी केली जाऊ शकते आणि 30 मिनीटात रिजल्ट मिळू शकतो. एक किटची किंमत 450 रुपये आहे. जर कोरोना संशयिताचा अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. 

कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल

व्यक्तीला या आधी कधी कोरोना झाला आहे का नाही, याची माहिती या अँटीजन टेस्टमधून मिळते. आयसीएमआरने जारी निर्देशात सांगितले की, 'सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये , ऑफिस व पब्लिक सेक्टर यूनिटला अँटीजन टेस्ट करण्यासा सल्ला दिला जात आहे. ही चाचणी आरोग्य कर्मचारी आणि इतर ऑफीस कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आहे.'

इथे होईल रॅपिड अँटीजन टेस्ट

 • राज्य सरकारद्वारे चिन्हित कंटेनमेंट झोन मध्ये.
 • सर्व सेंट्रल-स्टेट गवर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये.
 • नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअरच्या मान्यता प्राप्त प्रायवेट हॉस्पिटल्समध्ये.
 • नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेट्रीजने मान्यता प्राप्त प्रायवेट लॅब्समध्ये.
 • आयसीएमआर मान्यता प्राप्त टेस्टिंग लॅबमध्ये.

कोणाला करावा लागेल चाचणी

आयसीएमआरनुसार, कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटमध्ये इंफ्लुएंजासारखी लक्षणे आढळल्यास अँटीजन टेस्ट करावी लागेल. लक्षणे नसलेल्या व्यक्तींची किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही टेस्ट केली जावी. याशिवाय हॉस्पिटल्समध्ये असलेल्या कीमोथैरेपी व ट्रांसप्लांटचे रुग्ण आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचीही चाचणी व्हायला हवी.

साउथ कोरियाने तयार केली किट

आयसीएमआरनुसार, राज्यांना स्टँडर्ड अँटीजन किट (Q COVID-19 Ag kit)नेच चाचणी करण्याचा सल्ला देत सांगितले की, या चाचणीसाठी कोणत्याही मशीनची गरज नाही आणि 30 मिनीटात चाचणी पूर्ण होईल. या चाचणीची रिपोर्ट डोळ्यांनी पाहता येईल. ही कीट साउथ कोरियामधील कंपनी एसडी बायोसेंसरने तयार केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...