आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ICMR Research Update, Coronavirus News; Plasma Therapy Is Not Effective In Preventing Death Of Corona Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिसर्च:प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखण्यास प्रभावी नाही, आयसीएमआरचा दावा

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लाज्मा थेरपी कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखण्यास प्रभावी नाही. ही माहिती इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. ICMR ने सांगितल्यानुसार, प्लज्मा थेरपीच्या मदतीने कोरोना रुग्णांच्या परिस्थीमध्येही सुधारणा होत नाही. 14 राज्यांच्या 39 हॉस्पीटलमधील 464 रुग्णांवर प्लाज्मा थेरपीचे परीक्षण करण्यात आले.

रुग्णांच्या दोन ग्रुपवर परीक्षण करण्यात आले

ही थेरपी कोरोना रुग्णांवर किती प्रभावी आहे, हे समजण्यासाठी ट्रायल करण्यात आले. ट्रायलसाठी दोन ग्रुप बनवण्यात आले. इंटरवेंशन आणि कंट्रोल. इंटरवेंशन ग्रुपमध्ये 235 कोरोना रुग्णांना प्लाज्मा देण्यात आला. तर, कंट्रोल ग्रुपमध्ये 233 रुग्णांना कोव्हिड-19 ची स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली. 28 दिवस दोन्ही ग्रुपवर लक्ष ठेवण्यात आले.

प्लाज्मा थेरपीमुळे मृत्यू थांबले नाही

पहिल्या ग्रुपमध्ये ज्या 235 रुग्णांना प्लाज्मा देण्यात आला, त्यातील 34 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या ग्रुपमध्ये प्लाज्मा न दिलेल्या रुग्णांमधील 31 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, दोन्ही ग्रुपमधील 17-17 रुग्णांची परिस्थिती खालवली होती.

ICMR ची रिसर्च सांगते की, प्लाज्मा थेरपीमुळे थोडासा फायदा झाला. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि थकवा ग्रस्त असलेल्या रूग्णांना काहीसा आराम मिळाला आहे. परंतु ताप आणि खोकल्याच्या बाबतीत या थेरपीचा परिणाम दिसला नाही.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय

अमेरिकन रेड क्रॉसनुसार, कोविड-19 मधून ठीक झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाज्मा घेऊन कोरोना संक्रमित रुग्णांना दिला जातो. यामुळे रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी सामना करणाऱ्या नवीन अँटीबॉडीज तयार होतात. ही थेरपी भारताशिवाय अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरियासह अनेक देशात सुरू आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser