आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ICMR Studies In 75 Districts Will Identify Those Who Do Not Have Symptoms Of Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना:लक्षणे आढळून येत नसलेल्यांची नव्या पद्धतीने आेळख पटणार, 75 जिल्ह्यांत आयसीएमआरने अभ्यास

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्गाचे स्वरूप नेमके किती व कशा प्रकारे आहे हे तपासण्यासाठी एक प्रायाेगिक संशाेधन

पवनकुमार 

देशात काेराेना संसर्गाची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे देश सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यात तर पाेहाेचला नाही ना, अशी शंका यायला लागते. अशा संसर्गाचे स्वरूप नेमके किती व कशा प्रकारे आहे हे तपासण्यासाठी आयसीएमआर देशातील ७५ जिल्ह्यांत एक प्रायाेगिक संशाेधन प्रकल्प राबवणार आहे. 

काेराेनाची लक्षणे नाहीत अशा लाेकांमध्ये काेराेनाशी लढण्यासाठी अँटिबाॅडी आहेत का, याचा अभ्यास आयसीएमआर करणार आहे. तपासणी कशा प्रकारे केली जाईल याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु दाेन पद्धतींवर मंथन सुरू आहे. पहिले-एलिसा अँटिबाॅडी टेस्ट. त्यात रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जाईल. त्याचा अहवाल काही वेळातच मिळताे. तूर्त असे किट उपलब्ध नाही, परंतु लवकरच येऊ शकते. दुसरा पर्याय आरटी-पीसीआर पूल टेस्टिंगचा आहे. त्यात एकाच वेळी तीन-चार रुग्णांचे नमुने घेतले जातात. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला निगेटिव्ह मानले जाईल. पाॅझिटिव्ह आल्यास पूलमध्ये सहभागी सर्व लाेकांची तपासणी केली जाईल. 

आयसीएमआरनुसार या ७५ जिल्ह्यांत प्रत्येकी ४०० लाेक या अभ्यासात सहभागी हाेतील. त्यासाठी रेड, आॅरेंज, ग्रीन झाेनमधून रँडम्ली लाेकांची निवड केली जाईल. अभ्यासात सहभागी लाेकांची संख्या वाढवलीदेखील जाऊ शकते. काेणत्याही आजाराची लक्षणे नसलेल्या लाेकांनाच या आराेग्यविषयक पथदर्शी प्रकल्पात सहभागी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...