आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावरुन केंद्र सरकारला खडे बोल सुनावले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, संपूर्ण देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर याची नोंद केली जाणार आहे. भारत सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. सरकारने पुढे म्हटले की, आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ज्याअंतर्गत कोरोनाशी संबंधित मृत्यूंबाबत अधिकृत कागदपत्रे दिली जातील. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कडकपणा दाखवल्यानंतर 10 दिवसांनी सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
काय आहेत मार्गदर्शक तत्वे?
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी, आण्विक चाचणी, रॅपिड-अँटीजन चाचणी किंवा डॉक्टरांनी रुग्णालय किंवा घरी तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह ठरवले आहे. अशाच लोकांच्या मृत्यू् प्रमाणपत्रावर याची नोंद केली जाणार आहे. विषबाधा, आत्महत्या, हत्या किंवा अपघातासह इतर कारणांमुळे होणारे मृत्यू हे कोरोनाशी संबंधित मृत्यू मानले जाणार नाहीत. ती व्यक्ती कोरोना संक्रमित असल्यावर ही हे मान्य केले जाणार नाही असे मार्गदर्शक तत्वांत म्हटले आहे.
चाचणीनंतर 30 दिवसांच्या आत होणारे मृत्यू कोरोनाशी संबंधित मानले जातील
सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आयसीएमआरच्या अभ्यासानुसार 95% मृत्यू एखाद्या व्यक्तीला कोरोना संक्रमित झाल्याच्या 25 दिवसांच्या आत होतात. परंतु, आता नियमात बदल करुन कोरोना चाचणीनंतर 30 दिवसाच्या आत होणारे मृत्यू कोरोना संबंधित मानले जातील. रुग्णाचा मृत्यू घरी किंवा हॉस्पिटलमध्ये झाला असला तरीही हा नियम लागू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.