आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CISCE बोर्डाचा निकाल जाहीर:10वीचे 98.94%, तर 12वीचे 96.93% विद्यार्थी पास; 12वीत 5 विद्यार्थ्यांनी प्रथमस्थानी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE-10वी) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र (ISC-12वी) 2023 चे निकाल रविवारी दुपारी 3 वाजता जाहीर झाले. यंदा दहावीत 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुली 99.21% आणि मुले 98.71% आहेत.

तर बारावीत 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुली 98.01% आणि मुले 95.96% आहेत.

CISCE-2023 च्या 10वी-12वी परीक्षेत सुमारे 2.5 लाख विद्यार्थी बसले होते. इयत्ता 12वी मध्ये 5 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला असून त्यापैकी 3 मुली आहेत. आणि इयत्ता 10वी मध्ये 9 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्येही 3 मुलींचा समावेश आहे.

विद्यार्थी CISCE या http://cisce.org किंवा http://results.cisce.org या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

टॉपर्सची यादी

12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी

 • रिया अग्रवाल - 99.75%
 • इपशिता भट्टाचार्य - 99.75%
 • मोहम्मद आर्यन तारिक - 99.75%
 • शुभम कुमार अग्रवाल - 99.75%
 • मान्या गुप्ता - 99.75%

10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी

 • रुशील कुमार - 99.8%
 • अनन्या कार्तिक - 99.8%
 • श्रेया उपाध्याय - 99.8%
 • अद्वय सरदेसाई - 99.8%
 • यश मनीष भसीन - 99.8%
 • तनय सुशील शहा - 99.8%
 • हिया सांघवी - 99.8%
 • अवशी सिंग - 99.8%
 • संबित मुखोपाध्याय - 99.8% ​​​​​​

पुनर्मूल्यांकन करू शकता

CISCE नुसार, जर कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या निकालावर काही आक्षेप असेल किंवा तो त्याच्या गुणांवर समाधानी नसेल तर तो पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतो. उत्तरपत्रिकांची फेरतपासणी 21 मेपर्यंत सुरू राहणार आहे.

2022 मध्ये 2 लाख 31 हजार 63 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती

2022 मध्ये ICSE-10वी बोर्डाच्या परीक्षेत एकूण 2 लाख 31 हजार 63 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 99.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी 99.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 99.97% मुले उत्तीर्ण झाली.

ISC-12वी साठी देखील 96 हजार 940 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यामध्ये 50 हजार 761 मुले आणि 45 हजार 579 मुलींचा समावेश होता. 18 विद्यार्थ्यांनी 99.75% गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला.