आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ideal For All, Dealing With The People Of These 5 States In The War Against Corona

लाॅकडाऊन:कोरोनाच्या विरोधातील युद्धात या 5 राज्यांतील लोकांचे वागणे सर्वांसाठी आदर्श, कर्नाटकमध्ये लाेकच राेल माॅडेल

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकमध्ये लाेकच राेल माॅडेल, केरळने क्वाॅरंटाइनचा अवधी वाढवत संसर्ग राेखला

। देशात लाॅकडाऊननंतरही काेराेनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. दरराेज नवीन प्रकरणे समाेर येत आहेत. परंतु, काही राज्य जनजागृती, कडक कायदा व त्वरित निर्णयांमुळे काेराेनाविराेधातील युद्धात चांगल्या स्थितीत समाविष्ट हाेतात. या राज्यांना लाॅकडाऊनमध्ये कडक अंमलबजावणीचा साेपा मार्ग निवडला नाही. उलट उपलब्ध साधनांचा याेग्य वापर करून प्रभावी उपाययाेजना केली. त्याविषयी प्रमाेद कुमार यांचा वृत्तांत..

कर्नाटकात परदेशींची संख्या जास्त, किट घालूनच लाेक घराबाहेर पडतात, राज्य १२ व्या स्थानावर गेले

कर्नाटकमध्ये ९ मार्च राेजी पहिला रुग्ण आढळून आला हाेता. ११ मार्चला पहिला मृत्यू झाला हाेता. तेव्हा दिल्लीबराेबरच कर्नाटकची स्थिती सर्वात वाईट हाेती. कर्नाटकातील सर्वात माेठे शहर बंगळुरूमध्ये आहे. आयटी कंपन्यांची संख्या जास्त असल्यामुळे येथे परदेशातील लाेकांची ये-जा जास्त असते. त्यामुळेच सुरुवातीला काेराेनाबाधित लाेकांमध्ये महाराष्ट्र व केरळनंतर कर्नाटकचे नाव हाेते. २८ मार्च राेजी येथे १८ बाधित सापडले. परंतु, त्यानंतर येथील प्रकरणांत घट झाली. पडताळणीनंतर सरकारने लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली हाेती. दुपारी २ वाजेपर्यंत किराणा, दूध, भाजीपाला मिळत हाेता. सामान्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. किट नसलेले लाेक रेनकाेट घालतात.आता हे राज्य १२ व्या स्थानावर गेले आहे. 

केरळ : सर्वाधिक चाचण्या केल्या; १४ नव्हे, २८ दिवस क्वॉरंटाइन, दुसऱ्यावरून १० व्या क्रमांकावर

देशातील पहिला रुग्ण ३० जानेवारीला केरळमध्ये आढळला होता. सुरुवातीला मुंबई, नंतर केरळ दुसऱ्या क्रमांकावर होता. आता केरळ नवव्या क्रमांकावर, तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. केरळमध्ये प्रत्येक तीन गावांमध्ये दोन आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक संशयिताला आयसोलेशन वॉर्डात ठेवणे शक्य झाले. होम क्वॉरंटाइनचा कालावधी १४ ऐवजी २८ दिवस करण्यात आला. राज्याच्या दृष्टीने देशात सर्वाधिक एक लाख ७० हजार लोकांना होम क्वॉरंटाइन करून कडक देखरेख ठेवली जात आहे. देशात ९ एप्रिलपर्यंत एकूण १ लाख २० हजार कोरोना चाचण्या झाल्या केरळमध्ये २४ तास काम करणाऱ्या १८ तज्ञांचे पथक बनवण्यात आले.ते कडक निगराणी ठेवतात.

ओडिशा : लॉकडा‌ऊन, वेब पोर्टल, हेल्पलाइन क्रमांक सर्व काही सर्वात आधी केले

ओडिशा असे राज्य आहे, ज्याने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वात आधी पावले टाकली. यामुळेच येथे कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे. ३ मार्चला वेबपोर्टल तयार करत परदेशातून येणाऱ्यांना नोंदणी करण्याचे सांगणारे ओडिशा देशातील एकमेव राज्य आहे. सुमारे ५ हजार जणांनी नोंदणी केली. नोंदणी करणाऱ्या सर्वांना सरकारने होम क्वॉरंटाइन राहिल्यावर १५-१५ हजार रुपये दिले. १३ मार्चला कोरोना हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला. जे ८४ हजार जण राज्याबाहेरून आले त्यांच्यासाठी पंचायत पातळीवरच ७ हजार आयसोलेशन वॉर्ड तयार केले. ५ जिल्हे आणि ८ मोठी शहरे राष्ट्रीय लॉकडाऊनच्या एक आठवडे आधीच बंद केली. 

उत्तराखंड : आजाराची माहिती लपवल्याप्रकरणी होतो गुन्हा दाखल, जमातीचे १८० समोर

उत्तराखंडमध्ये स्थिती थाेडी चांगली झाली होती. परंतु त्याचवेळी  २ ते ६ एप्रिल दरम्यान काेराेनाचे २४ रुग्ण समाेर आले. ते सर्व जमातीचे हाेते. डीजीपीने ६ एप्रिलला कडक आदेश बजावले. माहिती लपवणाऱ्या व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जेवढ्या लाेकांना त्याच्यामुळे संसर्ग झाला तेवढे खटले तयार केले जातील. त्यात संसर्ग झालेल्याचा मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. परिणामी दडून बसलेल्या १८२ जमातींपैकी १८० जण समाेर आले. त्यानंतर उर्वरित दाेघांना शाेधून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांत आता एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 

छत्तीसगड : जानेवारीपासून परदेशात जाणाऱ्यांना स्कॅन करून लॉकडाऊनपूर्वीच शोधले

काेराेनाविराेधात लढणाऱ्या छत्तीसगडला राेल माॅडेल म्हटले जाऊ शकते. येथे पहिला रुग्ण १९ मार्चला समाेर आला. १० रुग्ण एप्रिलमध्ये समाेर आले. या दहापैकी ९ जण बरे झाले आहेत. ९ एप्रिलला ८ नवे बाधित सापडले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमध्ये देखील लाॅकडाऊनच्या काळात आवश्यक सामानासाठी बाजारपेठ दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहील. आदिवासी भागातील बाजारहाटही सुरू आहेत. देशात छत्तीसगडची स्थिती चांगली आहे. परदेशात जाणाऱ्या लाेकांची माहिती काढून त्यांचा अभ्यास करण्याचा सरकारचा निर्णय त्यामागे महत्त्वाचा मानला जाताे. १ जानेवारी ते २४ मार्चपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा डेटा व स्थिती सरकारने माहीत करून घेतली. 

बातम्या आणखी आहेत...