आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताला एक नव्हे तर तब्बल 9 पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशातील दलितविरोधी मानसिकता पुन्हा एकदा उजेडात आली आहे. येथील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पावटी खूर्द गावचे माजी सरपंच तथा कुख्यात विक्की त्यागीच्या वडिलांनी दलितांविषयी आक्षेपार्ह विधान केले. 'आपल्या शेतातील विहिर, समाधी व बोअरवेलवर एखादा दलित व्यक्ती दिसला तर त्याला 5 हजार रुपये दंड व 50 जोडे मारण्याची शिक्षा मिळेल,' अशी दलितविरोधी दवंडी त्यांनी गावात दिली. या दवंडीचा एक VIDEO चांगलाच व्हायरल झाला आहे.
या दवंडीमुळे गावात एकच खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दवंडी देणाऱ्या कुंवरपाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी दुपारी आरोपी राजबारी त्यागीच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.
SSP ने जातीय टिपणीवर नोंदवली हरकत
SSP अभिषेद यादव यांनी सांगितले की, पावटी खूर्दच्या राजबीर नामक व्यक्तीने गावात आक्षेपार्ह जातीय विधान व मारहाण केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी हा व्यक्ती व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई केली जात आहे.
या प्रकरणी एसएसपी अभिषेक यादव यांच्या निर्देशांनुसार सोमवारी रात्रीच दोन्ही आरोपींविरोधात भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दवंडी देणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर माजी सरपंचाच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली.
गावाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी
चरथावल पोलीस ठाणे हद्दीतील पावटी खूर्द गावात विक्की त्यागी याची अनेक दशकांपर्यंत दहशत होती. त्याची 2016 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर त्या पत्नी मीनू त्यागी हिने त्याच्या टोळीची सूत्रे हाती घेतली आहेत. विक्की त्यागीचे वडील तथा गाव पावटीचे माजी सरपंच राजबीर सिंह यांचाही विविध गुन्ह्यांत समावेश आहे. त्यागी व त्याचे कुटंबिय यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे गावातील लोक त्यांच्या दहशतीखाली राहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.