आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Biden Becomes President, India Will Be His Top Priority, Pakistan Will Not Tolerate Terrorist Activities

डेमोक्रॅटिक पार्टीचे वचन:बिडेन राष्ट्राध्यक्ष बनले तर भारताला देतील सर्वात जास्त प्राधान्य, पाकिस्तानकडून होणार्‍या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राअध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांचे धोरणात्मक दस्तऐवज केले जाहीर, नोव्हेंबरमध्ये होणार आहे निवडणूक
  • यामध्ये पाकिस्तानचे नाव घेतले गेले नाही, परंतु त्याला सीमेपलिकडे दहशतवादाचा प्रसार करणारा असे म्हटले गेले आहे

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅटीक पार्टीने पॉलिसी स्टेटमेंट जारी केले आहे. जो बिडेन हे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस या उप राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. पॉलिसी स्टेटमेंटचा साधा अर्थ असा आहे- सत्तेत आल्यानंतर संभाव्य धोरणे अवलंबली जाऊ शकतात. डेमोक्रॅट पक्षाने स्पष्टपणे सांगितले की, भारताशी चांगल्या संबंधांना उच्च प्राधान्य दिले जाईल. दक्षिण आशियातील सीमेपलीकडे होत असलेल्या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत.

नाव न घेता पाकिस्तानला इशारा
या विधानात दक्षिण आशिया प्रमुख लक्ष्य आहे. भारत आणि पाकिस्तान दोघेही या प्रदेशात येतात. बराक ओबामा यांच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानविषयी आपली भूमिका कडक केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ती वाढवली. आता डेमोक्रॅट पक्षानेही बिडेन यांच्या धोरणांचे चित्र स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडे इशारा करत स्पष्ट सांगण्यात आले की, सीमापार दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला, त्यांना मदत केली असे पुराव्यांसह भारताने जगाला अनेक वेळा सांगितले आहे.

चीनविरोधातही कठोर धोरण
या दस्तऐवजात चीनचे नाव घेतले गेले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, हिंदी महासागराविषयीची धोरण अगदी स्पष्ट राहिल. नियम व कायदे पाळावे लागतील. चीन आपल्या शेजार्‍यांना धमकावू शकणार नाही. भारत आणि अमेरिका जगातील मोठे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील.
भारतीय अमेरिकी कम्युनिटीचे स्वतःचे एक महत्त्व आहे. याच्या मुद्द्यावर लक्ष दिले जाईल. दोन्हीही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही आहेत.

एच -1 बी व्हिसा रिफॉर्म होईल
एच -1 बी व्हिसावर भारत आणि अमेरिकेच्या सरकारांमध्ये बरेच मतभेत झाले आहेत. पहिल्यांदा एखाद्या पक्षाने आपला दृष्टीकोण व धोरणाची झलक दिली. धोरणात्मक निवेदनात म्हटले आहे की उच्च-कौशल्य असलेल्या एच -1 बी व्हिसाधारकांच्या नोकर्‍या आणि त्यांची संख्येकडे विशेष लक्ष दिले जाईल. त्यांच्या कुटुंबियांना एकत्र ठेवण्याबाबत धोरणे बनवली जातील. हेट क्राइम्सच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र शाखा स्थापन केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...