आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतासह अवघे जग कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करत आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण मंगळवारी म्हणाले, ‘सरकारने देशातील सर्वांनाच लस देऊ असे म्हटलेले नाही. तसेच आपल्याला लसीची गरज नसल्याचे भारतातील एका वर्गाला वाटते.’ पत्रकार परिषदेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “लस किती लोकांना द्यायची, हे उत्पादनावर ठरेल. कोरोनाची साखळी तोडणे हा सरकारचा उद्देश आहे. आपण जोखमीतील लोकांना लस देऊन संसर्गाची मालिका खंडित केली तर संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याची गरज नाही.’
ऑक्सफर्डच्या “कोविशील्ड’ लसीसाठी सीरमच्या चाचण्यांत तामिळनाडूच्या स्वयंसेवकाने दुष्परिणामांचा दावा केला होता. यामुळे टाइमलाइन प्रभावित होण्याची शंकाही आरोग्य सचिवांनी फेटाळून लावली. डॉ. भार्गव म्हणाले, एखाद्या स्वयंसेवकावर गंभीर दुष्परिणाम झाला असता तर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असते. सरकारने ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या पुढे सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
संकेत : निरोगी लोकांना लस विकत घ्यावी लागू शकते
सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात म्हटले आहे की, सरकार देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार नाही. जोखीम असलेले व प्राधान्यक्रमाच्या समूहांचे लसीकरण केले जाईल. पूर्णपणे निरोगी असलेल्या लोकांना मेडिकलमधील इतर उत्पादनांप्रमाणेच ही लस खरेदी करावी लागू शकते. वृत्तानुसार, कुणाला लस घ्यायची नसेल तर सरकार बळजबरीने त्याचे लसीकरण करणार नाही.
प्रक्रिया : डीजीसीआयची तपासणी
- चाचण्यांत दुष्परिणामांच्या प्रकरणांचा तपास डीसीजीआयकडून करण्यात येत असतो.
- चाचण्यांपूर्वी सहमती पत्र घेतले जाते, त्यात संभाव्य धाेक्यांची माहिती असते.
- चाचण्यांच्या परिणामांवर रुग्णालयातील एक समिती लक्ष ठेवते. प्रभाव दिसला तर ते महिनाभरात डीसीजीआयला कळवतात.
खात्री दिली : लस सुरक्षितच
सीरमने म्हटले आहे की, जोवर आमची लस सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे हे सिद्ध होणार नाही, तोवर आम्ही ती मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी जारी करणार नाही. आम्ही त्याचा विश्वास देत आहोत.
स्पष्टीकरण : ‘कोविशील्ड’ पूर्णपणे सुरक्षित व इम्युनोजेनिक : सीरम
“कोविशील्ड’ लसीच्या चाचण्या करत असलेल्या सीरमने सलग तिसऱ्या दिवशी स्पष्टीकरण दिले. संस्थेने म्हटले आहे की, “कोविशील्ड’ ही पूर्णपणे सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे. चाचण्यांत स्वयंसेवकांना नुकसान झाले नाही.
इम्युनोजेनिक म्हणजे काय : ही वैद्यकीय संज्ञा आहे. व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी एखादी लस आपल्या शरीरात किती प्रतिकारक्षमता निर्माण करण्यात सक्षम आहे आणि ती पुढे िकती काळ कायम राहील, असा त्याचा अर्थ आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.