आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Export Of Novavax Vaccine Is Not Approved, 1 Crore Doses Will Be Wasted By December

संभ्रम:कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीला मंजुरी न मिळाल्यास डिसेंबरपर्यंत 1 कोटी डोस वाया जाणार

नवी दिल्ली / पवनकुमार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आग्रह धरला की कंपनीला कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीला मंजुरी देण्यात यावी. कंपनीकडून ‘सीडीएससीओ’लाही आग्रह करण्यात आला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून आरोग्य मंत्रालयाला दिलेल्या अर्जात म्हटले की, जर कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीला मंजुरी दिली गेली नाही तर डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांचे १ कोटी डोस निकामी होती. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी लस गरजेचीच आहे. त्यामुळे ती वाया घालवली जाऊ नये. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, सीरम इन्स्टिट्यूटला एक कोटी डोस खरेदी करण्याची ऑर्डरही मिळाली आहे. कंपनीकडून आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेल्या अर्जात म्हटले की, कोवोवॅक्स लसीचे जर भारतातून निर्यात केली गेली तरी भारतात कोरोना लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देशात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीचा पुरेसा साठा आहे. तिचा कोणताही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे सरकारकडून कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीसाठी कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिले जावे, असा आग्रह करण्यात आला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून भारतातही कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे. परंतु अजूनपर्यंत सीडीएससीओने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि, इंडोनेशियामध्ये कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंपनीकडे कोवोवॅक्स लसीचा मोठा साठा पडून आहे. मात्र तो वापरलाच गेला नाही तर डिसेंबरअखेरीस १ कोटी डोस वाया जाण्याची भीती कंपनीला भेडसावत आहे.

बातम्या आणखी आहेत...