आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणुक:सरकार आल्यास नितीश तुरुंगात असतील : चिराग, बेलगाम महत्त्वाकांक्षांना लगाम घाला : जदयू

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेजस्वी, चिराग परस्परांवर टीका करणे टाळताहेत

बिहार निवडणुकीत प्रचार मोहिमेसह वाकयुद्ध देखील शिगेला पोहोचले आहे. चिराग पासवान यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बक्सर जिल्ह्यातील डुमराव येथील जाहीर सभेत रविवारी चिराग म्हणाले, आमचे सरकार सत्तेवर आल्यास नितीश कुमार तुरुंगात असतील. सात निश्चयात भ्रष्टाचार करणाऱ्यांचे काय केले पाहिजे? आमचे सरकार स्थापन होताच सात निश्चय योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी केली जाईल. अधिकारी असो की स्वत: मुख्यमंत्री. घोटाळा केला असल्यास थेट तुरुंगात रवानगी केली जाईल, असा इशारा चिराग यांनी दिला आहे. चिराग यांनी बिहारमध्ये दारूबंदी पूर्णपणे अयशस्वी झाल्याचाही आरोप केला. राज्यात सगळीकडे नकली व बेकायदा मद्य विक्री केली जात आहे. चिराग यांच्या वक्तव्यावर जदयूने कडक शब्दांत आक्षेप घेतला.

पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले, चिराग यांच्या वक्तव्यातून निर्लज्जपणा दिसतो. आम्ही त्याचा निषेध करतो. चिराग मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. परंतु, आतापर्यंत आमदारकीची निवडणूक देखील जिंकू शकलेले नाहीत. त्यांनी आपल्या बेलगाम महत्त्वाकांक्षांना लगाम घालण्याची गरज आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत २९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारमधील विद्यमान २२ मंत्री यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शपथपत्रातील तपशीलानुसार सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत वार्षिक सरासरी ६० टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक २९० टक्के सहकार मंत्री राण रणधीर यांच्या संपत्तीत वाढ झाली.

तेजस्वी व चिराग एकच : जदयू, लोजपा नसलेल्या ठिकाणी भाजपला मत द्या : चिराग
जदयू प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह रविवारी म्हणाले, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांची छुपी युती आहे. दोघेही एका रणनीति अंतर्गत सोबत वाटचाल करत आहेत. परंतु, जनतेला यांच्यातील समझोता लक्षात आला आहे. दुसरीकडे चिराग पासवान यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले, लोजपाचा उमेदवार नसलेल्या ठिकाणी भाजपला मत द्या. राज्यात लोजपा-भाजपचे सरकार येईल. आगामी सरकार नितीशमुक्त सरकार असेल. तेजस्वी व चिराग परस्परांच्या विरोधात बोलणे टाळू लागले आहेत.